"आचारी" लोकांना उपासमारीची वेळ! - संजय जमदाळे

"आचारी" लोकांना उपासमारीची वेळ! - संजय जमदाळे
बीड/प्रतिनिधी
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर लोकांना खूप बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.प्रशासन आपली भूमिका चांगलीच पार पाडत आहे परंतु गेल्या दोन महिन्यापासून लाॅकडाउन असल्यामुळे नाही लग्न झाले आहेत,ना हॉटेल चालू आहेत. लग्नामध्ये जेवण बनवणारे "आचारी" लोकांना आता खूपच बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे तर काही "आचारी" (स्वयंपाक करणारे) लोकांना उपासमारीची वेळ आलेली दिसते.
"आचारी" (स्वयंपाक बनवणारे) लोकांनादेखील कुटुंब आहे व तेही कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्यावर देखील कुटुंबाची जिम्मेदारी आहे जर कुटुंब प्रमुखाला काम नसेल तर त्याच्या कुटुंबाने काय खावं? कुठून पैसे घ्यावे? कोण पैसे देणार? या लोकांचे घर देखील किरायानेच आहेत? अशे या लोकांचे हजारो प्रश्न समोर येत आहेत.
प्रशासनाने खूप चांगली भूमिका पार पाडली अन्नधान्य वाटप केले एकही उपाशी राहू नये म्हणून खूप असे कठोर प्रयत्न केले परंतु ज्या लोकांकडे राशन कार्ड नाही त्यांनी काय करावं? त्या लोकांनी कुठून धान्य आनावे ? अश्या लाखो समस्या या लोकांपुढे आहे.
तरी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी "आचारी"(स्वयंपाक) बनवणार्या लोकांचा थोडासा विचार करावा अशी या लोकांची विनंती आहे.








