जी.प मा.शाळा टाकळसिंग ता.आष्टी येथे योगदिन साजरा

जी.प मा.शाळा टाकळसिंग ता.आष्टी येथे योगदिन साजरा
बीड/वार्ताहर
दि.21 जुन रोजी सर्वत्र योग दिन साजरा करण्यात याला .त्या प्रमाणे आष्टी तालुक्यातील जी.प.माध्यमिक शाळा टाकळसिंग येथेही योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये आष्टी तालुक्यातील टाकळसिंग जिल्हापरीषद माध्यमिक शाळेमधिल योगदिनाला अगळे वेगळे महत्त्व प्राप्त झालेले दिसुन आले.कारण या शाळेतील शिक्षिका श्रीमती मनिषा उजगरे यांनी लाँकडावूणच्या काळामध्ये योग प्रशिक्षण घेतले व आयुष् मंत्रालय भारत सरकारचि त्यांनी योग शिक्षक म्हणून पदवी प्राप्त केलेली आहे. या आपल्या प्रशिक्षीणाचा फायदा आपल्या प्रशाळेला व्हावा या हेतुने त्यांनी योग दिनाच्या निमीत्ताने शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना योगसानाचे धडे दिले व योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्त्व पटले व विद्यार्थ्यांंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले . या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारीव्रण्द यांनी श्रीमती उजगरे यांनी आभार मानले.








