यंदा चा बेस्ट टिव्ही ॲंकर ऋषिकेश शेलार

यंदा चा बेस्ट टिव्ही ॲंकर ऋषिकेश शेलार
बीड/वार्ताहर
बी. बी. सी फिल्म प्रॉडक्शन आणि ओम साई संस्थान शिर्डी यांच्या कडून देण्यात येणारा, साई कलारत्न समाजभूषण उत्कृष्ट ॲंकर पुरस्कार, झूम ऑन न्यूज मराठी चे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक आर. जे ऋषि शेलार यांना देण्यात आला . हा पुरस्कार अभिनेत्री रेणुका शहाणे आणि बी. बी. सी फिल्म प्रॉडक्शन चे डायरेक्टर सुदाम संसारे साहेब ह्यांच्या शुभहस्ते आर. जे ऋषि शेलार यांना देण्यात आला.
गेल्या पाच वर्षांपूर्वी रेडिओ पासून सुरू केलेला प्रवास ऋषिकेश ने टिव्ही पर्यंत आणून पोहचवला.आणि आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांना अगदी आपलेसे केले. या पूर्वीही ऋषिकेश ने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. ऋषिकेश एक उत्तम ॲंकर च नाही तर तो एक उत्तम वक्ता ही आहे. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त झालेल्या शहिद भगतसिंग कॉलेज दिल्ली येथील देशपातळीवरील वकत्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा तो एकमेव होता. सध्या ऋषिकेश दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे एम ए.द्वितीय वर्गात शिक्षण घेत आहे.








