जनतेसाठी आलेल्या डिपीचा "उद्योग" ; घरातअंधार फ्रीजमध्ये "झमझम" गार,जनतेला टेन्शन अधिकाऱ्याचं फ्रिजला कनेक्शन !

जनतेसाठी आलेल्या डिपीचा "उद्योग" ; घरातअंधार फ्रीजमध्ये "झमझम" गार,जनतेला टेन्शन अधिकाऱ्याचं फ्रिजला कनेक्शन
बीड/वार्ताहर
शहरातील डी.पी.डी.सी.योजने अंतर्गत डीपी बसविण्यात आली मात्र ति डिपी उद्योगासाठी बसविण्यात आल्याची चर्चा शहरात होत असून डी.पी.डी.सी.योजना हि शासनाच्या मार्फत असुन ज्या भागात विद्युत भर ज्यास्त असतो त्या भागाचा भर कमी करण्यासाठी शासनामार्फत परमीट स्कीम मधुन हि डिपी बसवली जाते परंतु येथिल कर्मचाऱ्याने चक्क उद्योगासाठी डीपी बसवली असल्याचं बोललं जात आहे.त्या डिपी मधून फॅक्टरी ला उद्योगासाठी कनेक्शन दिला आहे आणी त्या डि.पी वरून तेवढाच एक कनेक्शन असल्याचं देखील नागरिकांकडून बोललं जात असुन विद्युत कर्मचाऱ्यांना त्या फॅक्टरी वाल्यांकडून आर्थिक लाभ झाल्याची चर्चा शहरात होत आहे.शासनाच्या या फसवणुकीत कोण कोण सहभागी?कोणत्या अधिकाऱ्याने दिली परवानगी?उद्योगासाठी डिपी मधुन कनेक्शन कसं काय?याबद्दल सविस्तर वृत्त लवकर..!








