दहावीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा - आ. विनायकराव मेटे

दहावीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा - आ. विनायकराव मेटे
सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ! ...आ. विनायकराव मेटे
बीड/वार्ताहर
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आ.विनायकराव मेटे यांनी अभिनंदन करत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या.
नुकताच लागलेल्या निकालात 96.94 टक्के विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील प्रवास करतांना योग दिशा व प्रचंड महेनत करत आपले ध्येय पुर्ण करावेत यासह स्पर्धा परिक्षा देत आपल्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करावे अशा शुभेच्छा आ. विनायकराव मेटे यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्या.
नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आणि विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली . आपापल्या निकालाचे प्रमाणपत्र पाहण्यासाठी विद्यार्थी पालकासहित शाळा व शिक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून आली. समेशन ऑफ बेस्ट फाईव्हच्या माध्यमातून आज निकाल दिला जातो . बहुतांशी विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे आ.विनायकराव मेटे व शिवसंग्रामच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे . मागील दोन वर्ष कोरोनात गेल्याने शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना न मिळता विद्यार्थ्यांसह समाज व देश पाठीमागे गेला आहे म्हणून विद्यार्थ्यांनी यानंतर अधिक परिश्रम करून खऱ्या अर्थाने स्वतःला सिद्ध करुण समाजाला व देशाला पुढे घेऊन जाण्याची पात्रता अंगीकारावी अशी आशा व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आ.विनायकराव मेटे यांच्या वतीने देण्यात आल्या तसेच ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश संपादन करता आले नाही अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता दुप्पट परिश्रम करून यशश्री खेचून आणावी यासाठी "कल करे सो आज , आज करे सो अभी " या म्हणीचा प्रत्यक्ष जीवनात वापर करावा व आपल्या आवडत्या क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करावे. असेही व्यक्त केले.








