बीड शहरातील चालु रोडच्या कामामुळे वाहतुक शाखेकडुन नागरिकांना सुचना

Beed

बीड शहरातील चालु रोडच्या कामामुळे वाहतुक शाखेकडुन नागरिकांना सुचना

बीड/वार्ताहर 

सद्यस्थितीमध्ये बीड शहरामध्ये जालना रोड व बार्शी रोड या प्रमुख मार्गावर सोमेश्वर मंदीर ते काकु नाना हॉस्पीटल या दरम्यान नवीन काँक्रिट रस्त्याचे काम चालु आहे . रस्त्याचे काम काही प्रमाणात झालेले असुन येणाऱ्या आठवड्यामध्ये ( दि .19 / 06 / 2022 ) पासुन छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील काम चालु करण्याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी त्यांचे पत्राव्दारे कळविले आहे . तरी बीड शहरातील नागरीकांना वाहतुक शाखेकडुन खालील सुचना देण्यात येत असुन वाहतुक व्यवस्था सुरळीत चालावी व नागरीकांची गैरसोय होऊ नये याकरिता सदर सुचनांचे सर्व नागरीक व व्यापारी बांधव यांनी पालन करावे . 

1. बीड शहरातील नगर रोड भागातील ज्या नागरीकांना जालना रोडवरुन महालक्ष्मी चौक बायपास कडे अथवा गुरुकुल शाळा , सेंट अॅन्स स्कुल व पोददार स्कुल अथवा जुना मोंढा भागात जावयाचे आहे त्यांनी नगर नाका कॅनॉल रोड - रिलायंस पेट्रोल पंप मार्गे जालना रोडवर जावे .

 2. जालना रोडवरील महालक्ष्मी चौक / बीड बायपास कडुन येणाऱ्या ज्या वाहनधारकांना नगर रोड भागात जावयाचे आहे अशा वाहनधारकांनी रिलायंस पेट्रोल पंप - कॅनॅल रोड- नगर नाका या बायपास मार्गाचा वापर करावा .

 3. बीड शहरातील सुभाष रोड , माळीवेस भागातील ज्या नागरीकांना बस स्टँड परिसर , नगर रोड परिसरात यावयाचे असेल अशा नागरीकांनी माळीवेस - धोंडीपुरा- बलभीम चौक- राजुरी वेस- बशिरगंज चौक - जयभवानी चौक या मार्गाचा वापर करावा .

 4. बीड शहरातील नागरिकांनी पुढील पंधरा दिवस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये न येता पर्यायी मार्गाचा वापर करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे . 

Sharing

Visitor Counter