अस्ताव्यस्त रहदारीने ग्रासलेल्या भाजी मंडईचा प्रश्न शिवसंग्रामच्या माध्यमातून मार्गी-शेषेराव तांबे,अकुंश बुंदेले

Beed

अस्ताव्यस्त रहदारीने ग्रासलेल्या भाजी मंडईचा प्रश्न शिवसंग्रामच्या माध्यमातून मार्गी-शेषेराव तांबे,अकुंश बुंदेले

शिवसंग्रामच्या मागणीलाा यश...

बीड/वार्ताहर

शिवसंग्रामचे उपशहराध्यक्ष श्री शेषेराव तांबे व शिवसंग्रामचे पदाधिकारी तसेच नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी श्री उमेश ढाकणे यांनी व त्यांच्या टीमने रस्त्यावर उतरून नेहमीच वाहतुकीस होणारा अडथळा दूर करत सर्वांना पर्यायी मार्ग देऊन भाजीमंडईतील वर्दळीचा व रहदारीचा प्रश्न सोडवला तसेच भाजीमंडीतील रस्त्यावर मुरूम टाकून या रस्त्याची दुरुस्तीच्याही सूचना केल्या व हा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल शिवसंग्रामच्या वतीने व वार्ड क्रमांक 08 मधिल नागरिकांच्या वतीने श्री उमेश ढाकणे यांना सन्मानित करण्यात आले.

 

काम करणाऱ्यां अधिकाऱ्यांचा यथोचित स्वागत -सत्कार आणि मुजोर अधिकाऱ्यांना धडा हा शिवसंग्रामचा अलिखित नियमच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . शिवसंग्रामचे बीड शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्रामचे शिष्टमंडळ बीड नगरपालिकेचे नवीन कार्यकारी अधिकारी श्री उमेश ढाकणे यांच्या भेटीस गेले वार्ड क्रमांक आठ मधील भाजी मंडई ते राज हॉटेल या रस्त्यावर असणारे शासकीय वाचनालय , दोन मोठे हॉस्पिटल , तलाठी सज्जा कार्यालय, संस्कार प्राथमिक विद्यालय व भाजी मंडई आहे .शहरातील नागरिक व ग्रामीण भागातील शेतकरी यांची नेहमीच वर्दळ या ठिकाणी असते . त्यातच मोटारसायकली, रिक्षा अशांची सुद्धा वर्दळ असल्याने ट्रॅफिक जाम होते आहे यासंदर्भात यापूर्वीही शिवसंग्रामच्या माध्यमातून अनेक निवेदने दिली गेली परंतु मागील सीईओ डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी कधीही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला नाही . नूतन सीईओ श्री उमेश ढाकणे यांना निवेदन देताच हे अधिकारी व त्यांची संपूर्ण टीम रस्त्यावर उतरून अवैधरित्या रस्त्यावर उभी असणारी फेरीवाले, हातगाडे यांना बाजूला करून रिक्षावाल्यांना पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग करावी अशी ताकीद दिली व नागरिकांसाठी रस्ता मोकळा करून दिला . तसेच शेतकऱ्यांसाठी रस्त्याच्या कडेला पाठीमागे सरकुन थोडिशी जागाही दिली . दवाखान्यात ये -जा करण्यासाठी रस्ता मोकळा केला . शाळेच्या गेट समोरील वाहने बाजूला काढली . खऱ्या अर्थाने प्रश्न सोडवायचे असल्यास प्रत्यक्षरीत्या रस्त्यावर उतरून कसे सोडवले जातात त्याचा एक उत्तम नमुना म्हणून श्री उमेश ढाकणे साहेब यांच्याकडे पाहिले जात आहे . त्यांच्या या कार्याचे व संपूर्ण टीमचे कौतुक करून यांचा येथील नागरिकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला व खऱ्या अर्थाने बीडला एक चांगला अधिकारी लाभला याचं नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे याप्रसंगी उपस्थित या भागातील प्रतिष्ठित व्यापारी नितीन मंत्री,बाबा ढाकणे, ॲड कुकडगावकर,धूप्पड शेठ, ॲड.सिकची ,ओमशेठ बाहेती ,प्रमुख लोक उपस्थित होते तसेच शिवसंग्रामचे युवा नेते अंकुश बुंदेले, उमेश बुंदेले, अनुप बुंदेले,लोकेश बुंदेले,राहुल बुंदेले,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

 

Sharing

Visitor Counter