शिवराम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर

Beed

शिवराम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर

आज पासुन मराठवाडा दौऱ्यावर

पूर्णवादी बँक सचालकांसह सभासद, प्रतिष्ठीत नागरिक, खातेदार, गुरूबंधुंशी साधणार संवाद

बीड/प्रतिनिधी

शिवराम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर हे आज शुक्रवार १७ जुन ते रविवार १९ जुन २०२२ पर्यंत तीन दिवसाच्या मराठवाड्यातील बीड, जालना आणी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांच्या प्रमुख उपस्थीतीत पूर्णवादी बँकेचे संचालक, पूर्णवादी परिवार, प्रतिष्ठीत नागरिक, बँकेचे सभासद ,खातेदार, हितचिंतक आणी गुरूबंधू यांच्याशी डॉ. पारनेरकर हे संवाद साधणार आहेत.

आज शुक्रवार १७ जून २०२२ रोजी दुपारी एक वाजता शिवराम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर हे आष्टी येथील पूर्णवादी बँकेच्या शाखेत सभासद, पूर्णवादी परिवार आणि प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांनतर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बीड येथील पूर्णवादी नागरिक सहकारी बँकच्या संचालक मंडळाची संवाद सभा ते बीड शहरातील हॉटेल अन्वीता येथे घेणार आहेत. या संवाद सभेस पूर्णवादी बँकेचे अध्यक्ष डॉ.अरूण निरंतर हे उपस्थीत राहणार आहेत. शनिवार १८ जून २०२२ रोजी लातूर येथील पूर्णानंद मंगल कार्यालय सावेवाडी येथे सकाळी अकरा वाजता सभासद, पूर्णवादी परिवार आणि प्रतिष्ठित नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत. त्यांनतर परळी शहरातील डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांचे निवासस्थान येथे दुपारी तीन वाजता भेटीगाठी घेणार असुन सायंकाळी सहा वाजता परभणी येथील हॉलिडे फनपार्क व रिसोर्ट, महिंद्रा शोरूम रोड एमआयडीसी येथे सभासद, पूर्णवादी परिवार आणि प्रतिष्ठित नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत .रविवार १९ जून २०२२ रोजी दुपारी एक वाजता जालना येथील सर्वज्ञ हॉल, उड्डाणपुलाचे खाली, भाग्यनगर, जुना जालना येथे सभासद, पूर्णवादी परिवार आणि प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद होणार आहे. तर सायंकाळी सहा वाजता औरंगाबाद येथील यशोमंगल कार्यालय, पन्नालाल नगर, औरंगाबाद येथे सभासद , पूर्णवादी परिवार आणि प्रतिष्ठित नागरिकांशी डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर हे संवाद साधणार आहेत.

 

Sharing

Visitor Counter