वार्ड क्रमांक 07 मधील बोकारिया कॉर्नर, कबाड गल्लीतील पाईपलाईन लिकेज केव्हा निघणार? अनिकेत देशपांडे

Beed

वार्ड क्रमांक 07 मधील बोकारिया कॉर्नर, कबाड गल्लीतील पाईपलाईन लिकेज केव्हा निघणार? अनिकेत देशपांडे

बीड/वार्ताहर

बीड शहरातील वॉर्ड क्रमांक 07 बोलकी येते मधील बोकरिया कॉर्नर कबाड गल्लीतील पाईपलाईन खूप दिवसापासून ‌ लिकेज झाली आहे त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे या लिकेजच्या पाण्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वार्डातील लोकांचे आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.या लिकेजमुळे रस्त्यावर शेवाळे साचले असल्यामुळे रस्त्यावर चालणार्‍या वाहनांचे छोटे मोठे अपघात रोज होत आहेत.या लिकेज रस्ता लिकेज मुळे महिला लहान मुले वयस्कर लोकांना खूप मोठा त्रास होत आहे

 प्रभाग ७ मधील पाईपलाईन लिकेज मुळे लहान मुले,वयस्कर लोकांना वावरतांना ञास सहन करावा लागत आहे. येथील नागरिक हा ञास निमुटपणे सहन करत असल्याने सत्ताधाऱ्यांचे फावते आहे.प्रशासनाने ह्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. परिसरातील कांही ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर येत असून या घाण पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पाण्यामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. जागोजागी पाणी साचल्याने पायी चालणे देखील नागरिकांना अवघड झाले आहे. या खड्ड्याने वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नगर पालिका प्रशासनाकडे याबाबत वेळो-वेळी तक्रारी करून देखील नगर परिषद या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे..तरी या लिकेज कडे बीड नगर परिषदेने लवकरात लवकर लक्ष देऊन हे लिकेज त्वरित काढण्यात यावे असे पत्रकाद्वारे मागणी शिवसंग्रामचे युवक उपशहर अध्यक्ष अनिकेत देशपांडे व वार्ड क्रमांक 07 मधील नागरिकांनी केली आहे.

Sharing

Visitor Counter