नुपूर शर्मावर बीड मध्ये गुन्हा दाखल, सर्व नेते एकत्र !

Beed

नुपूर शर्मावर बीड मध्ये गुन्हा दाखल, सर्व नेते एकत्र !

बीड/वार्ताहर 

नुपूर शर्मा ने हजरत पैगंम्बर यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर कारवाई करण्साठी करण्यासाठी भारत भर अंदोलन करण्यात येत आहे तर काही ठिकाणी गुन्हा ही दाखल करण्यात आले. कथित वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेल्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध १५ जून रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे . नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे सर्वत्र पडसाद उमटले . त्याला बीडदेखील अपवाद राहिले नाही . समाजबांधवांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला . सर्वपक्षीय समाजबांधवांनी १ जून रोजी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती . याबाबत कारवाई न झाल्याने १५ जून रोजी सर्वपक्षीय बांधवांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर , उपअधीक्षक संतोष वाळके यांची भेट घेऊन गुन्हा नोंदविण्याची मागणी लावून धरली . यानंतर शिष्टमंडळ शहर ठाण्यात पोहोचले . पो . नि . रवी सानप यांनी त्यांची फिर्याद घेतली . अॅड . सय्यद अजिम खाजापाशा ( २७ , रा . शर्हेशाहनगर , बीड ) यांच्या फिर्यादीवरून भाजप नेत्या नुपूर शर्मा ( रा . फिरोजशहा रोड , नवी दिल्ली )यांच्याविरुद्ध कलम २ ९ ५ अ , ५०५ ( २ ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला . २७ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता टीव्ही चॅनेलवरील एका कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे . तपास सायबर सेलचे पो . नि . रवींद्र गायकवाड यांच्याकडे सोपविला आहे .

Sharing

Visitor Counter