भारतीय बौद्ध महासभा (प) जिल्हा कार्यकारिणी बरखास्त ; नवीन जिल्हा कार्यकारी निवडली जाणार

भारतीय बौद्ध महासभा (प) जिल्हा कार्यकारिणी बरखास्त ; नवीन जिल्हा कार्यकारी निवडली जाणार
बीड/प्रतिनिधी
दि.१४ भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय कार्यालय येथून दिनांक 08/06/2022 रोजी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे, महाराष्ट्र राज्य शाखेचे भिकाजी कांबळे यांच्या सहीचे पत्र आज बीड येथील विष्णू कांबळे अध्यक्ष बीड पश्चिम जिल्हा भारतीय बौद्ध महासभा यांना मिळाले आहे. बीड पश्चिम ची विद्यमान कार्यकारणी विहित कार्यकाळ पूर्ण झाल्या असल्याने बीड जिल्हा (प) कार्यकारी तात्काळ प्रभावी पणे बरखास्त करण्यात येत आहे, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये नवीन जिल्हा कार्यकारिणी निवड करण्याबाबत स्थळ वेळ याबाबत लवकरच आपणास अवगत करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी माहिती महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी कळवले आहे. यामुळे निश्चितपणे भारतीय बौद्ध महासभेत काम करू इच्छिणाऱ्या अनेकांच्या आशा पल्लवी झाले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा नवचैतन्य प्राप्त होईल अशी चर्चा सध्या दिसून येत आहे.








