बीडला धक्कादायक प्रकार पाच वर्षापासून एका महिलेचे लैंगिक शोषण

बीडला धक्कादायक प्रकार पाच वर्षापासून एका महिलेचे लैंगिक शोषण
12 वर्षाच्या मुलीला ठेवले वेठीस एस.पी कडे केली तक्रार
बीड/प्रतिनिधी
दि.१३ वडगांव कलाकेंद्रावर बळजबरीने शारिरीक अत्याचार ५ वर्षापासुन करुन गेत असुन आता १२ वर्षाच्या मुलीला बेपत्ता करुन माझ्यावर जीवघेणा हल्ला करुन ही पोलीस १५ दिवसापासुन तक्रार घेत नसल्याची तक्रारदारांना सांगण्यात आलं. संगिता प्रभाकर पिसाळ, वय ३० वर्षे, रा.सेलु जि. परभणी येथील रहिवाशी असुन मला २ मुली आहेत. माझ्या नवऱ्याने मला ७ वर्षापुर्वी सोडुन दिले, दोन लहान मुलींना घेऊन मी घराबाहेर पडले. दोन लहान मुलींना चांगल जगवण्यासाठी मला वडगांव केंद्रामध्ये याव लागलं .मला वडगांव (मांजरसुंबा) ता.जि.बीड येथील कला केंद्रात ५ वर्षापुर्वी आणण्यात आले. तिथे बैठक लावुन नाचायला लावुन मनाविरुध्द वेश्या व्यवसाय करायला लावत असे, माझा नाविलाज होता कारण मी त्यांच्याकडुन ५० हजार रु अॅडव्हान्स घेतलेले होते. त्यामुळे ते माझ्या कडुन फक्त धंदा करुन घेत पैसे देत नसत.
दि. १ जुन २०२२ रोजी रात्री ८.०० वा माझे पाय दुखत असल्याने मी बैठकीत नाचु शकत नव्हते, मी नाचत नसल्याने आणि ग्राहकाला खुश करण्यासाठी जात नसल्याने कला केंद्र चालवणारी भाभी परभणीकर यांनी मला नेकनुरचा खाटीक जो हा कला केंद्राच्या भाभी सोबत पार्टनर असुन त्याने माझ्या सोबत बळजबरी करण्याच्या हेतुने मला वायरने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. लाठी-काठी, लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. मला पाणी सुध्दा न देता रात्रभर अंधाऱ्या खोलीत ठेवले. मी दुसऱ्या दिवशी पहाटे एका ट्रकमधुन जालना येथे गेले तेथुन सेलुला गेले. गळ्यातले सोने गहाण ठेवुन मी दोन दिवसांनी बीड ला आले. मी शहर पोलीस स्टेशन, शिवाजी नगर पोलीस स्टेशन, पोलीस अधिक्षक कार्यालयात गेले. माझे पाय, पाठ, हात काळे-निळे पडलेले अंग दाखवले मात्र माझी कोणीही तक्रार घेत नाही.माझी १२ वर्षाची अज्ञान मुलगी कला केंद्रा वरील भाभी परभणीकर आणि खाटीकवाला रा. नेकनुर ता. जि. बीड यांनी गायप केली आहे, ते माझ्या मुलीला याच धंद्यात घेवून जातील अशी मला भिती असुन त्यांनी माझी मुलगी मला परत द्यावी व पाच वर्षा पासुनमाझ्या कडुन माझ्या मनाविरुध्द शाररीक धंदा करुन घेत असल्या बाबत गुन्हा दाखल करुन मला न्याय द्यावा व त्यांच्या पासुन मला व माझ्या मुलीच्या जीवाला धोका असल्याने संरक्षण द्यावे अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालया समोर मी आत्मदहन करेल. असा इशारा दिला आहे तरी तात्काळ पिढी त्याची दखल घेऊन अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी त्याच्यासोबत समाजसेविका नेत्या शैलाताई मुसळे,विलास बामणे, रमेश वाघमारे ,बंडू निसर्गंध प्रभाकर, चालणे चंद्रकला लव्हळे, मीराताई मसकर आदी उपस्थित होते.








