शिवसंग्राम आयोजित पु.अहिल्यादेवी होळकर समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे-नारायण काशीद

शिवसंग्राम आयोजित पु.अहिल्यादेवी होळकर समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे-नारायण काशीद
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा.ना. प्रविण दरेकर याच्याहस्ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा
" मुख्य आकर्षण - प्रसिद्ध अभिनेत्री ईषा केसकर जय मल्हार फेम बानु "
बीड/वार्ताहर
आ.विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम व भारतीय संग्राम परिषद आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पु.अहिल्यादेवी होळकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.पुरस्काराचे वितरण मा.आ.प्रवीणजी दरेकर याच्या शुभहस्ते होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ. विनायकराव मेटे तसेच मुख्य आकर्षण प्रसिद्ध अभिनेत्री ईषा केसकर ( बानु -जय मल्हार फेम) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या समाजभूषण पुरस्काराचे उद्या रविवार,दि.12 जून 2022 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे सकाळी 11 वाजता वितरण होणार आहे.
शिवसंग्राम आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचे आपापल्या क्षेत्रामध्ये भरीव योगदानासाठी व त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी "समाज भूषण पुरस्काराचे " वितरण केले जात आहे. या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा.ना. प्रविणजी दरेकर साहेब तसेच फिल्म अभिनेत्री ईशाजी केसकर ( बानु -जय मल्हार फेम ) उपस्थित राहणार असुन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.विनायकराव मेटे तसेच प्रमुख उपस्थिती भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे,शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद,शिवसंग्रामचे बीड शहराध्यक्ष अँड. राहुल मस्के,शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ मनीषाताई कुपकर, माजी पं स.सभापती सौ. मनीषाताई कोकाटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा समाज भूषण पुरस्कार वितरित केला जाणार आहे.या पुरस्कारांमध्ये सन्मानचिन्ह व यथोचित सत्कार केला जाणार असून यामध्ये ह.भ.प गोपाळ महाराज ( अध्यात्मिक क्षेत्र ) , श्री अशोक चोरमले (सामाजिक,सामाजिक क्षेत्र ) ,श्री सुदाम निर्मळ (बालविकास अधिकारी,
प्रशासकीय क्षेत्र ) ,श्री गणपत काकडे (सामाजिक क्षेत्र ) , श्री सुरेश कांबळे (व्यावसायिक क्षेत्र ) ,श्री सतीश देवकते ( प्रशासकीय क्षेत्र ) ,श्री. कल्याण आबुज (राजकीय क्षेत्र ) ,श्रीमती अश्विनी गलांडे (वैद्यकीय क्षेत्र ) , श्री रोहन माने, सिरम इन्स्टिट्यूट पुणे (वैद्यकीय क्षेत्र ) ,श्री महादेव सातपुते (व्यावसायिक क्षेत्र ) , .श्री विक्रम सोनसळे (कृषी तथा पशुपालन क्षेत्र ) ,डॉ.संतोषजी मारकड (वैद्यकीय क्षेत्र ) , किरन गावडे (उद्योग क्षेत्र) पांढरे ऋषिकेश (उद्योग क्षेत्र),,डॉ सुधाकर बिडकर ( दंत व मुखरोग तज्ञ , बीड,वैद्यकीय क्षेत्र),डॉ.सचिन चौधरी(वैद्यकीय क्षेत्र),डॉक्टर हनुमंत पारखे(वैद्यकीय क्षेत्र)
या मान्यवरांचा गुणगौरव करून समाजभूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे . या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन श्री. नवनाथ प्रभाळे,श्री ज्ञानेश्वर कोकाटे, श्री शिवराम शिरगिरे , श्री राहुल बनगर, श्री नितीन बुधनर , श्री भिमराव बेलदार, श्री उमेश कोकाटे, श्री रमेश कोकाटे, श्री .अविनाश राहिंज, श्री .सुनील खरात तथा बीड जिल्हा शिवसंग्राम परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. सामाजिक,अध्यात्मिक व राजकिय क्षेत्रातील प्रतिष्ठित महिला, पुरुष व तरुण वर्गानी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसंग्रामच्या वतीने करण्यात येत आहे .
