दिनदुबळ्यांना राजकय मंच देणारी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाची परळीत कार्यकारिणीची स्थापना

Beed

दिनदुबळ्यांना राजकय मंच देणारी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाची परळीत कार्यकारिणीची स्थापना

तालुकाध्यक्ष पदी शेख फरहतुद्दीनतर शहराध्यक्ष पदी शेख एजाज यांची निवड

परळी/वार्ताहर 

वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया हि नैतिक सिध्दांतावर आधारीत पक्ष असुन भारतीय राजकारणात आपल्या नैतिक मूल्यांच्या तत्वावर चालत राजकारणातून समाजकार्य करणारा पक्ष आहे. राजकारणात भ्रष्टाचार करून राजकारणाची प्रतिमा मलिन करून या देशाची विल्हेवाट लावणारे राजकारणी लोकांपासुन देशाला वाचविण्यासाठी नैतिक सिद्धांतांवर आधारित राजकारण करून संवैधानिक मार्गाने एक नवी दिशा देण्याचे काम वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय व राज्यस्तरावर करीत आहे. आपल्या नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणाच्या विस्तार करण्यासाठी नुकतीच परळी तालुक्यातील वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाची कार्यकारणी घोषित करण्यात आली असुन तालुकाध्यक्ष पदी शेख फरहतुद्दीन व शहराध्यक्ष पदी शेख एजाज हबीब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

या मोहिमेचा एक भाग म्हणून परळी येथे शुक्रवारी दिनांक 10 जुन 2022 रोजी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे सहसचिव व मराठवाडा प्रमुख सय्यद अब्दुल रहीम परळी दौर्यावर आले असता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

या बैठकीत वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया परळी तालुका अध्यक्ष पदी शेख परहातुद्दीन तर शहर अध्यक्षपदी शेख एजाज यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त पदाधिकाऱ्यांनी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष कासिम रसुल सहाब, महाराष्ट्र अध्यक्ष. यांच्या आभार मानले व संघटन मजबूत करण्यासाठी आपली वचनबद्धता दिली.बैठकीत परळी शहरातील अनेक मुद्द्यांवर आणि सध्याच्या राजकीय व आर्थिक संकटावर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा विमर्श करण्यात आले,या बैठकीत वेल्फेअर पार्टी परभणी जिल्हा अध्यक्ष व बीड जिल्हा प्रभारी तौसीफ अहमद , सय्यद जाफर भाई व इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter