बीड शहरात भगवान महेशजीची घोडे, उंट, रथासह शोभायात्रा;

Beed

बीड शहरात भगवान महेशजीची घोडे, उंट, रथासह शोभायात्रा;

महिला संघटनांकडून विविध स्पर्धा, शंभर दात्यांनी केले रक्तदान

माहेश्वरी समाजाचा वंशोत्पति दिवस महेश नवमी उत्साहात साजरी

बीड/प्रतिनिधी 

भगवान महेशजीच्या प्रतिमेचे आगमन आगळ्या वेगळ्या पद्धतीने , फुलांची उधळण करत , ढोल - ताशांच्या गजरात आणि माहेश्वरी समाजाच्या झेंड्या सोबत बालाजी मंदीर येथून शोभायात्रने उत्साहाची जोरदार सुरुवात झाली. घोडे, उंट, रथ हे शोभायात्रेतील आकर्षक साधनांनी शोभायात्रेची रंगत वाढवली. समाज बांधवांनी भजन म्हणून फुगडी खेळून आनंद घेतला. महिलांनीही या शोभायात्रेत उत्साहपूर्ण सहभाग घेतला.शोभायात्रेची सांगता मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी बालाजी मंदीर येथे झाली. महिला संघटनेने विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी शंभर समाजबांधवांनी रक्तदान करून अमुल्य योगदान दिले . 

 

माहेश्वरी ( मारवाडी ) समाजाचा ५१५५ वा वंशोत्पत्ति दिन बीड शहरात मोठ्या थाटामाटात उत्साहात झाला. मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन , महेश पूजन करून सर्वांच्या उपस्थितीत महेश वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सुभाषचंद्र सारडा, प्रमुख वक्ता म्हणून महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे पूर्व अध्यक्ष मधुसूदन गांधी, विशेष उपस्थितीत प्रदेश सभेचे कोषाध्यक्ष दिनेश सोमाणी, सामाजिक कार्यकर्ते भागिरथ चरखा , बीड जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष प्रदीप चितलांगे, सचिव संतोष सोहनी, कोषाध्यक्ष बालाप्रसाद जाजू, महिला जिल्हाध्यक्षा माधवी चितलांगे , सचिव शोभा जेथलिया, कोषाध्यक्षा अरुणा लड्डा हे उपस्थित होते.

महिला जिल्हाध्यक्षा माधवी चितलांगे यांनी आपल्या मनोगतात महिलांसाठी आयोजीत उपक्रमांची माहिती देऊन भविष्यात महिलांचे संघटन जास्तीत जास्त करण्याचा मनोदय व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष प्रदीप चितलांगे यांनी जिल्हा सभेमार्फत आयोजीत उपक्रमांची माहिती देताना, दोन वर्षात करोना काळात सुद्धा समाजबांधवानी दिलेल्या अतुलनीय सेवेचा उल्लेख केला.

माहेश्वरी समाजाचा इतिहास सांगताना प्रत्येक क्षेत्रात माहेश्वरी समाज आघाडीवर आहे. तो सुवर्ण काळ सर्व ज्ञात आहे. पुढेही सांगितला जाईल. परंतु येणाऱ्या काळात ठरावीक मार्गाने न जाता युवकांनी वेगवेगळ्या वाटा शोधाव्यात आणि स्वतःसोबत समाजाची प्रगती करावी, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात सुभाषचंद्र सारडा केले.

मुख्य वक्ता मधुसूदन गांधी यांनी समाज कल आज और कल या विषयावर समर्पक शब्दात मोलाचे मार्गदर्शन केले . येणाऱ्या युवा पिढी कडून अपेक्षा करतानाच पालकांनीही आपल्यात योग्य तो बदल करावा असे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शहरातील सर्व सामाजिक पुरुष व महिला मंडळ , प्रभाग संघटन, तहसील सभा, जिल्हा सभा यांनी परिश्रम घेतले.व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत यावेळी शहरातील सर्व मंडळाच्या पदाधिकारी मार्फत करण्यात आले.प्रदेश सभेचे कोषाध्यक्ष दिनेश सोमाणी यांनी शुभसंदेश व्यक्त केला. मुख्य शोभायात्रा मार्गात भागीरथ चरखा , संतोष सोहनी सुभाषचंद्र रमेशचंद्र सारडा, अमृत काका सारडा यांनी सेवा ठेवली होती. महेश नवमी निमित्त प्रदीप चितलांगे, माधवी चितलांगे आणि चितलांगे परिवार तर्फे संपूर्ण समाजासाठी स्नेहभोजनाचे नियोजन केेल होते. सुत्र संचालन निलेश मालपाणी व पंकज भूतडा यांनी केले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा सभेचे संयुक्तमंत्री प्रमोद मणियार यांनी मानले. 

 

करोना काळात जिल्ह्याभरात सेवा

माहेश्वरी जिल्हा सभेच्या वतीने जिल्ह्याभरात करोना बुस्टर डोस शिबीर आयोजित करण्यात आले तसेच बियाणी डिजीटल च्या वतीने ५ ते १० च्या माहेश्वरी विद्यार्थींसाठी लर्निंग ऐप मोफत उपलब्ध करुन देण्यात आले.

 

माहेश्वरी प्रगती मंडळाचे विविध उपक्रम

महेश नवमी निमित माहेश्वरी प्रगती मंडळातर्फे आरोग्य चिकीत्सा शिबीर , युवा माहेश्वरी तर्फे रक्तदान शिबीर , जिल्हा सभेतर्फे व युवा माहेश्वरी तर्फे कोवीड बुस्टर डोस , महेश युवा मंच तर्फे मोफत नेत्रतपासणी शिबीर व पासपोर्ट शिबीर आयोजीत करण्यात आले होते. आदित्य आयुर्वेद महाविद्यालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत मध्ये पंचकर्म पासेस वाटप करण्यात आले . 

Sharing

Visitor Counter