आमदार साहेब राष्ट्रीय महामार्गावरील साईडपट्ट्यावर मोठमोठाले दगड तसेच ठेवून गॅरेज व डाॅक्टरांच्या पोटापाण्याची सोय केलीय का?-डाॅ.गणेश ढवळे

आमदार साहेब राष्ट्रीय महामार्गावरील साईडपट्ट्यावर मोठमोठाले दगड तसेच ठेवून गॅरेज व डाॅक्टरांच्या पोटापाण्याची सोय केलीय का?-डाॅ.गणेश ढवळे
बीड/वार्ताहर
बीड शहरातुन जाणा-या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडरखडत पूर्णत्वास येत असतानाच सिमेंट रोडच्या साईडपट्ट्या भरताना मात्र बारीक मुरूम आणुन त्यावर पाणी टाकून रोलर फिरवुन साईडपट्ट्या दाबण्याऐवजी केवळ मुरूमाचे मोठमोठाले दगड आणुन टाकलेले असुन २७ मे रोजी टाकण्यात आलेले मोठमोठाले दगड त्याचठीकाणी असून रहदारीस अडथळा असून अपघातास निमंत्रण ठरत असून रात्रीच्या वेळेस जीवघेणे ठरत आहेत.त्यामुळेच त्याठीकाणी तसेच ठेवलेले दगड हे जालनारोडवरील गॅरेज व अपघात होऊन हाॅस्पिटल चालावेत म्हणून गॅरेज दुकानदार व डाॅक्टरांच्या पोटापाण्याची सोय केली आहे काय??असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांना पडला आहे.
अमर नाना नाईकवाडे थोडं लक्ष घाला-डाॅ.गणेश ढवळे
दि.२५ मे रोजी जालना रोडवरील सिमेंट क्राॅक्रीट रस्ता व साईड पट्ट्या यातील वाढल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते त्यामुळेच माजी नगरसेवक अमर नाना नाईकवाडे यांनी पाहणी करून साईड पट्ट्यामध्ये भरण्यात आलेल्या मुरमामध्ये असलेले मोठमोठे दगड काढण्यात यावेत व मुरूम रोलरने दाबून घेण्यात यावा अशी मागणी सदरील काम करणा-या कंपनीच्या सुपरवायझरला केली होती ,त्यानंतर दोन दिवसांनी २७ मे रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातील बाजुचे वळण रस्ते सिमेंट क्राॅक्रीटने जोडून रस्त्याचा उतार कमी केला होता मात्र साईड पट्ट्यातील मोठमोठाले दगडे काढुन रोलरने दाबण्यात आले नसुन अपघातास निमंत्रण ठरत आहेत त्यामुळेच अमर नाना नाईकवाडे यांनी पुन्हा एकदा संबधित सुपरवायझरला सुचना द्याव्यात.








