कानड़ी येथे शेती शाळा संपन्न

Beed

कानड़ी येथे शेती शाळा संपन्न

आष्टी/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व तालुका कृषी कार्यालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.७) कानडी खुर्द येथे विकास महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून खरीप हंगाम २०२२ साठी शेती शाळा कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, तालुका अभियान व्यवस्थापक विक्रम ठोबरे, सरपंच सिंधुताई जगताप, प्रभाग समन्वयक दासू शेलार, ग्रामसंघाचे अध्यक्ष सुनिता गव्हणे, प्रियंका साके, शहीनाज शेख यांच्यासह समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांना बीज उगवन क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले, तसेच सामूहिक खत वितरण, सामूहिक बी बियाणे वितरण, ठिबक सिंचन योजना, फळबाग लागवड, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करण्याबाबत बचत समूहातील महिलांना माहिती दिली. सुञसंचालन प्रतिक्षा आटोळे यांनी तर आभार जैबुन पठान यांनी मानले.

Sharing

Visitor Counter