‘स्वामी विवेकानंद’च्या विद्यार्थ्यांचे यश

‘स्वामी विवेकानंद’च्या विद्यार्थ्यांचे यश
बीड/प्रतिनिधी
तालुक्यातील ताडसोन्ना येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावी परिक्षेत नेत्रदिपक यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
ताडसोन्ना येथील श्री भगवान बाबा सेवाभावी संस्था संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परिक्षेत यश मिळवले आहे. यामध्ये निरज मस्के (89) प्रथम, श्रीनिवास चोले (86.67) द्वितीय तर दिव्या अशोक माने व ऋतुजा जयदेव ढाकणे (85.83) या दोन विद्यार्थीनींनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर कला शाखेत पुजा संजय जगदाळे, माया गणेश जाधव व सचिन गणेश वाघुंडे हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ.महादेव मुंडे यांच्यासह प्राचार्य सुधाकर मुंडे, प्रा.सय्यद, प्रा.सारिका सानप, प्रा.संगीता चोले, भोसले, भद्रशेट्टी, इंगोले, कसबे, गणेश हौसारे, बाळासाहेब घाडगे, महादेव हाटवटे यांनी अभिनंदन केले आहे.








