अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणातील मृत्युप्रकरणात सीआयडीमार्फत व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा-डाॅ.गणेश ढवळे

अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणातील मृत्युप्रकरणात सीआयडीमार्फत व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा-डाॅ.गणेश ढवळे
बीड/वार्ताहर
अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात मयत शितल गणेश गाडे यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी पोलीस तपास आधिका-यांची भुमिका संशयास्पद असल्याने सीआयडीमार्फत करण्यात येऊन प्रकरणाशी संबधितांची व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री,गृहमंत्री,पोलीस महासंचालक,अध्यक्ष राज्य महिला आयोग,मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य यांना ईमेलद्वारे केली आहे.
सविस्तर माहीतीस्तव
दि.०५ जुन २०२२ रोजी सीताबाई ऊर्फ शितल गणेश गाडे वय ३० वर्षे रा.बकरवाडी ता.जि.बीड हीचा अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे मृत्यु झाला. अगोदरच ३ मुली असल्यामुळे चौथ्यांदा गर्भवती असल्याने गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपात करताना मृत्यु झाल्याचे वैद्यकीय व पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्य़ात अनाधिकृतरित्या गर्भलिंग निदान व गर्भपात करण्याचे मोठे रॅकेट कार्यरत असुन मोठमोठाले वरिष्ठ पदावरील तसेच स्थानिक राजकीय नेत्यांच्या कृपाशिर्वादाने बिनबोभाट सुरू असून त्यामुळेच मुलींचा जन्मदर कमी होत असून पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
महत्वाची आरोपी एजंट मनिषा सानप यांना पीसीआर मागण्याऐवजी एमसीआर तपासी आधिका-यांची मागणी संशयास्पद
मयत शितल गणेश गाडे अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणातील गुन्हा दाखल झालेल्या ५ आरोपींपैकी महत्वाच्या आरोपी एजंट महिला मनिषा शिवाजी सानप राज्य.अर्धमसला ता. गेवराई यांच्या गेवराईतील राहत्या घरी मोठ्याप्रमाणात रोकड तसेच गर्भपाताची औषधे व साहित्य आढळुन आले असताना तपासी आधिकारी यांनी अंगणवाडी सेविका मनिषा शिवाजी मिसाळ यांना पीसीआर ऐवजी एमसीआर मागितला व तिची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे कारण सांगितले एकंदरीतच आरोपीच्या वकीलाऐवजी तपास आधिकारी आरोपीची वकीली आधिकार क्षेत्रात नसताना करताना दिसून येतात म्हणून एकंदरीतच प्रकरण संशयास्पद असुन संबधित प्रकरणाची निष्पक्षपातीपणे पारदर्शी चौकशी होऊन पिडीतेला न्याय मिळण्यासाठी सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर तपास आधिकारी यांच्या महत्वाच्या आरोपीला पीसीआर ऐवजी एमसीआर मागण्याच्या भुमिकेची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
गर्भपात प्रकरणातील संबधित आरोपी व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा
,एजंट म्हणून असलेल्या मनिषा शिवाजी मिसाळ यांच्या गेवराईतील घरात तपासादरम्यान रोख २९ लाख रूपये,१ कोटी रूपये किंमतीची ३ मजली ईमारत,९ एकर शेती आदि मोठ्याप्रमाणात बेहीशोबी मालमत्ता आढळुन आल्यामुळेच मुख्य सुत्रधार व ईतरांकडे किती संपत्ती आहे यासाठी संबंधित व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी.
गुन्ह्यातील आरोपी नर्स यांच्या मृत्युमुळे खळबळ आत्महत्या की हत्या??
दि.०८ जुन २०२२ रोजी अवैध गर्भपातातील ५ आरोपींपैकी परिचारीका सीमा सुरेश डोंगरे हिने दुपारी पालीच्या तळ्यात आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी पोलीसांचे म्हणणे आहे परंतु दि.०८ जुन २०२२ रोजी पहाटे पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असताना व आरोपींची नावे,पत्ता माहीत असताना आरोपीला ताब्यात घेऊन वैद्यकीय निगराणीखाली का ठेवण्यात आले नाही??पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असते तर तिचा जीव वाचला असता म्हणून संबधित प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल संबधित आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.








