औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथील कोविड रुग्णालयाची पाहणी केली

Beed

औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथील कोविड रुग्णालयाची पाहणी केली

 औरंगाबाद प्रतिनिधी/सिद्धांत कांबळे
औरंगाबाद: उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील सिपेत (केंद्रीय प्लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था) 'मेलट्रोन' इमारतीत नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड 19 रुग्णालयाची आज सकाळी पाहणी केली..
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य सेवेसाठी रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेऊन, खबरदारीचा उपाय म्हणून चिकलठाणा येथील मेलट्रोन इमारतीत कोविड 19 रुग्णालयाची उभारणी श्री. देसाई यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. या कोविड रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत असलेला सर्व सौयी सुविधांची माहितीही श्री. देसाई यांनी घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा चे आयुक्त तथा प्रशासन अस्तिक कुमार पांडेय. एमआयडीसीचे मुख्य अभियंता तुपे, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ. गुप्ता , अभय जरीपट्टे आदींची उपस्थिती होती...

Sharing

Visitor Counter