"मंथन" स्पर्धा परिक्षेत आष्टीचा वसुंधरा विद्यालयाचा आदेश दळवी राज्यात पाचवा

"मंथन" स्पर्धा परिक्षेत आष्टीचा वसुंधरा विद्यालयाचा आदेश दळवी राज्यात पाचवा
आष्टी/प्रतिनिधी
‘मंथन पब्लिकेशन’तर्फे घेण्यात आलेल्या मंथन सामान्य ज्ञान परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत दळवी आदेश अदिनाथ याने 300 पैकी 290 गुण मिळवून राज्यात पाचवा येण्याचा मान मिळविला आहे. आदेश दळवी हा वसुंधरा प्राथामिक विद्यालयात इयत्ता 4 च्या वर्गात शिकत आहे.वसुंधरा शाळेने कायम सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवत असूण,स्पर्धा परिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देऊन वाचन,लेखन,स्वावलंबन आदी गोष्टींवर भर दिला जातो.ज्यामुळे त्यांना स्वयंअध्ययनाची सवय लागते.याचा परिणाम एकाग्रतेवर होतो व प्रज्ञा शोध परीक्षांमध्ये याचे परिणाम दिसून येतात.आदेश याने मथंनच्या सामान्य स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश मिळविल्याने त्याचे वसुंधरा शाळेचे अध्यक्ष मनोरंजन धस,मुख्याध्यापक सिमा बोंदार्डे,उध्दव आण्णा विधाते यांच्यासह आदिंनी अभिनंदन केले आहे.








