व्यायामशाळा विकास अनुदान, क्रीडांगण विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Beed

व्यायामशाळा विकास अनुदान, क्रीडांगण विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बीड/वार्ताहर 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड मार्फत जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2022-23 या वर्षासाठी सर्वसाधारण व विशेष घटक योजना तरतूदी अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कॅन्टोनमेंट बोर्ड), शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय उप जिल्हा रुगणालय, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनाव्दारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवुन 5 वर्ष पुर्ण झालेले आहेत अशा शाळा व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र राहतील, क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी / पोलीस विभाग, शासकीय कार्यालये / जिमखाना हे अनुदानासाठी पात्र राहतील. करिता व्यायामशाळा विकास अनुदान व क्रीडांगण विकास अनुदान प्राप्त करुन घेण्याकरिता विहित नमुण्यातील परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बीड यांनी केले आहे.

 

            जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2022-23 या वर्षात संस्थेला व्यायामशाळा विकास अनुदान व क्रीडांगण विकास अनुदान प्राप्त करुन घेण्याकरिता विहित नमुण्यातील अर्जाचा नमूना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथून प्राप्त करुन घेवून विहित मुदतीत परिपूर्ण कागदपंत्रासह, विहित नमूण्यात दर्शविण्यात आलेले सर्व कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक राहतील. विहित नमुण्यातील अर्ज प्राप्त करुन ते सादर करण्याचा कालावधी 20 ते 24 जून 2022 आहे. विहित कालावधी नंतर आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत व ते विचारात घेतले जाणार नाहीत.

 

            विशेष घटक योजना तरतुदी अंतर्गत लाभाकरीता संबंधीत संस्था पदाधिकारी यांची अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील संख्या 50 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक असावे, लाभार्थी हे अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेत लाभार्थी निवड करताना लाभार्थी दलित वस्ती किंवा दलित वस्तीच्या लगत असने आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे अवाहन

Sharing

Visitor Counter