बीडमध्ये तरुणाची हत्या की आत्महत्या?

बीडमध्ये तरुणाची हत्या की आत्महत्या?
बीड/वार्ताहर
बीड शहरातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली असुन नेमक याची हत्या की आत्महत्या यावर चर्चा चालु असुन त्याचा घातच झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कोंडीराम भांडवले ( २० , रा . बार्शी नाका , तेलगाव रोड , बीड ) हा शहरातील एका ऑइल मिलमध्ये काम करायचा . ७ जून रोजी रात्री तो नित्याप्रमाणे घरी पोहोचला नाही . त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री साडेआठ वाजता संपर्क केला . यावेळी घरी यायला किती वेळ आहे , असे आईने विचारले असता , घराकडे येत आहे , असे त्याने सांगितले . मात्र , तो घरी पोहोचलाच नाही . रात्री ११ वाजेनंतर तो फोनही घेईना , त्यामुळे कुटुंबीयांनी मित्रपरिवार , ऑइल मिल व नातेवाईकांकडे चौकशी केली , पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही . आज ८ सकाळी सात वाजता स्वराज्यनगरातील रिकाम्या प्लाट मधील दाट झाडीत त्याचा मृतदेह आढळून आला . मृतदेहाजवळ गावठी पिस्तूल व दुचाकी मिळून आली . दुचाकीच्या नेमप्लेटवर ऑनलाइन मागविलेल्या पार्सलच्या नावाची पट्टी चिटकवलेली होती . यावरून मयताची ओळख पटली .








