दादेगाव येथे कृषिदूतांचे आगमन शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

दादेगाव येथे कृषिदूतांचे आगमन शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
बीड/वार्ताहर
आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे श्री. छत्रपती ,शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालय आष्टी येथील चतुर्थ वर्षातील विध्यार्थी कृषीदूत यांचे दादेगाव या गावात आगमन झाले आहे . या वेळी कृषीदूत , शुभम पताळे, आकाश पाटील, प्रशांत माने, शिवम शिंदे, प्रविण साबळे, अविनाश बरळ,रोहित वाघमारे, ओम हावळे, आकाश सुर्यवंशी, भगवान सुर्यवंशी यांचे शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन स्वागत केले . प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ व प्रा.तांबोळी एम आय यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2022-23 याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली हे कृषी दुत शेतकर्यांना तीन महिने गावकऱ्यांना शेति विषयी मार्गदर्शन करणार आहेत यावेळी , सरपंच सौ. अरुणाबाई गिते, उपसरपंच सौ. मंदा बंडाले, ग्रामसेवक श्री. जी.एन.गिरी, विजय पोटे, गणेश गरुड, कार्यक्रम अधिकारी प्रा.देसाईपाटील एस.आर , तसेच शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .








