नगरपालिकेचा जाच शिवसंग्राम मोडीत काढणार-शेषेराव तांबे

Beed

नगरपालिकेचा जाच शिवसंग्राम मोडीत काढणार-शेषेराव तांबे

भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात बीडकरांनो पुरावे द्या-शेषेराव तांबे

 बीड नगर परिषेदेतील भ्रष्टाचार्‍यांना शासन करण्यासाठी चौकशी समितीला लेखी पुरावे द्या-शेषेराव तांबे

बीड/वार्ताहर

बीड नगरपालिकेचे भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे नुकतेच निलंबन झाले आहे . त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पाळे-मुळे खोदून अश्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना कडक शासन होण्यासाठी चौकशी अहवाल समितीला बीडच्या नागरिकांनी लेखी पुरावे द्यावे असे आवाहन शिवसंग्रामच्या शहराउपाध्यक्ष शेषेराव तांबे यांच्या वतीने करण्यात येत आहे .

      शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांनी बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि अन्य कर्मचारी विकास कामात कशा पध्दतीने अनियमितता करतात, शहरातील इतर प्रश्नांविषयी देखील भूमिका मांडली होती. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी आ. मेटे यांनी सभागृहात केली होती. या प्रश्नावर नगर विकास मंत्र्यांनी दखल घेत चौघांच्या निलंबनाचे आदेश दिले होते . मात्र याबाबतची ऑर्डर निघालेली नव्हते. दरम्यान, मुख्याधिकारी गुट्टे यांनाही निलंबित करावे अशी मागणी आ.विनायकराव मेटे यांनी लाऊन धरली होती. मात्र चौकशीनंतर कारवाई करू असे मंत्र्यांनी सभागृहात सांगितले. त्यानंतरही कांही दिवसापूर्वी मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांची बदलीने उपायुक्त म्हणून पदस्थापना झाली. त्यामुळे आ. विनायकराव मेटे यांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला व मुंबईत ठाण मांडून मुख्याधिकारी गुट्टे यांच्यासह पालिकेतील पाच जणांच्या निलंबनाचे आदेश काढायला लावले होते.

      या पार्श्वभूमीवर बीड नगरपालिकेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी अनुषंगाने बीड नगरपरिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध विकास योजनांतर्गत कामांची प्रलंबित असलेल्या चौकश्या पुर्ण करुन अहवाल सादर करणे तसेच श्री. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, बीड नगरपरिषद यांच्यासंदर्भात प्राप्त सर्व तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करुन अहवाल आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत शासनास सादर करणेबाबत जिल्हाधिकारी बीड यांना आदेश देण्यात आलेले आहेत.या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे व अन्य प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या कालावधीत केलेल्या अनागोंदी कारभाराचा भांडाफोड करण्यासाठी शहरातील सुजान नागरिकांना शिवसंग्रामच्या वतीने भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचे आवाहन करण्यात येत आहे.असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवसंग्राम चे शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे यांनी कळविले आहे.

       बीड नगर परिषदेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशीसाठी शिवसंग्रामच्या वतीने बाजू मांडण्यासाठी नागरिकांचे मनोगत मागवणार आहे.याबाबतीत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नगरपरिषदेकडून आपणास झालेल्या त्रासाबद्दल माहिती जसे की नगरपालिकेमध्ये गुंठेवारी, रस्ते, नाली,वृक्षलागवड, पाणीपुरवठा ,स्वच्छता बाबतीत अवाजवी कर लागला असेल तर शिवसंग्राम भवान नगर रोड बीड येथे संपर्क करावा.यामध्ये संशय व्यक्त केला जात आहे की, नगरपालिका मध्येबांधकाम शहर विकास वर्गणी व बेटरमेंट चार्जेस तसेच गुंठेवारीच्या नावाने गेल्या दीड वर्षात भरलेली रक्कम कोट्यावधी रुपयांची असून यामध्ये डुप्लिकेट पावत्यांचा वापर केलेला असू शकतो.येत्या काळात होणाऱ्या चौकशीसाठी अशा प्रकारच्या पावत्या पुरावा म्हणून मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसंग्राम सादर करणार आहे.असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

        यासाठी बीड नगरपालिकेच्या सुजान करदात्यांनी याकाळातील आपापल्या भरलेल्या कराच्या पावत्या तपासून पहाव्यात. नगरपालिकेत भरलेला कर व त्याची पावती ओरिजिनल आहे किंवा नाही याची मा.मुख्याधिकारी, नगर परिषद,यांच्याकडून खात्री करून घ्यावी.यादरम्यान आपली फसवणूक झाली आहे असे आपणांस वाटत असल्यास शिवसंग्रामच्या मध्यवर्ती कार्यालयास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क साधून माहिती द्यावी,शिवसंग्राम आपल्या तक्रारीची दखल घेऊन आपणास न्याय देईल.फसवणूक झालेल्या करदात्यांना चौकशी समितीसमोर बाजू मांडण्यासाठी शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते हाजी अब्दुल खालेक पेंटर व शिवसंग्रामचे शहराध्यक्ष ॲड.राहुल मस्के हे सहकार्य करतील.असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवसंग्रामचे शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे यांनी कळविले आहे.

Sharing

Visitor Counter