पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या आरती धुरंधरे या मातंग समाजातील विद्यार्थिनीवर ५ मे रोजी प्राणघातक हल्ला
Beed

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या आरती धुरंधरे या मातंग समाजातील विद्यार्थिनीवर ५ मे रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. सदर विद्यार्थिनी मृत्यूशी झुंज देत तिच्यावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. यावेळी न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्षा स्वाती खुळे यांनी तिची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली व तिला धूर देत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिले.








