पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी उत्तम ओव्हाळ
Beed

पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी उत्तम ओव्हाळ
बीड/प्रतिनिधी
येथील पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी संपादक उत्तम ओव्हाळ यांची निवड करण्यात आली आहे.
बीड येथील पत्रकार उत्तम ओव्हाळ हे गत अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करित आहेत, फोटोग्राफी सह एक हाडाचा पत्रकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या कार्याची दखल पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक विजय सुर्यवंशी, प्रदेश अध्यक्ष विजयकुमार वाव्हळ, उपाध्यक्ष प्रा. दशरथ थोडे, सचिव प्रवीण परमार यांनी घेऊन पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी उत्तम ओव्हाळ यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल ओव्हाळ यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे








