नाटककार, समीक्षक, दिग्दर्शक डाँ. सतीश पावडे यांना ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति सन्मान

Beed

नाटककार, समीक्षक, दिग्दर्शक डाँ. सतीश पावडे यांना ज्ञानयोगी डॉ.  श्रीकांत जिचकार स्मृति सन्मान

वर्धा/वार्ताहर 

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या परफाँर्मिंग आर्ट्स(फिल्म अँड थिएटर) विभागातील वरिष्ठ सहायक प्रोफेसर,महाराष्ट्र राज्य नाट्य सेन्साँर बोर्डाचे सदस्य आणि नाटककार, समीक्षक, दिग्दर्शक  डॉ. सतीश पावडे यांना नुकताच अमरावती येथे ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति सन्मान रोटरी क्लब आँफ अमरावती मिडटाउनच्या विद्यमाने बहाल करण्यात आला.
          डॉ.  श्रीकांत जिचकार स्मृति दिनानिमित काँलेज आँफ अँनिमेशन अँँड बायोइंजीनियरिंगच्या सभागृहात शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषरावजी खोडे यांच्या अध्यक्षतेखाली, विदर्भ साहित्य संघ अमरावतीचे अध्यक्ष आणि संपादक विलास मराठे, प्रसिद्ध हास्य कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग, समाजसेवी डाँ. बबन बेलसरे, सिद्धार्थ वानखेडे आणि काँलेज आँफ अँनिमेशन अँँड बायोइंजीनियरिंगचे प्राचार्य विजय राऊत  यांच्या विशेष उपस्थितीत हे सन्मानपत्र देऊन डाँ. पावडे यांचा गौरव करण्यात आला.
          डॉ. सतीश पावडे हे पांच विषयात एम.ए. असून जेआरएफ, एसआरएफ, मनोनीत टागोर फेलोशिप सह त्यांनी ललित कलेतील नाटक या विषयात महाराष्ट्रातील पहिली पीएच. डी. प्राप्त केली आहे. प्रकाशीत २५ पुस्तके,लिखित, भाषांतरीत आणि दिग्दर्शित ४० हून अधिक नाटके त्यांच्या नावावर आहेत. अनेक अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध पुरस्काराचे ते मानकरी राहिले आहेत.अनेक अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिषदांमधे त्यांचे  १०० हून अधिक शोध निबंध सादर झाले आहेत तसेच प्रकाशितही झाले आहेत. श्रीलंकेच्या डे ड्रीम थिएटरचा 'एक्सिलेंस इन थिएटर' हा अंतरराष्ट्रीय सन्मान तसेच भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या शोध शिष्यवृत्तिचेही ते मानकरी आहेत. ते नाट्यशिक्षक, प्रशिक्षक, मेंटर, कोच, ट्रेनर म्हणूनही गेली ३० वर्षे नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे ते राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. एकुणच गेल्या ३० वर्षातील साहित्य, संस्कृती, कला, लेखन, संपादन, भाषातर , समीक्षा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी हा सन्मान डॉ. सतीश पावडे यांना प्रदान करण्यात आला आहे.
          रोटरी क्लब आँफ अमरावती मिडटाउनचे अध्यक्ष आनंद दशपुते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्मृतिदिन  कार्यक्रम आणि सन्मान सोहळ्याची भूमिका संयोजक आणि माजी अध्यक्ष डॉ. विनायक कडू यांनी मांडली. सन्मानपत्राचे वाचन नाट्य सेन्सार बोर्डाच्या माजी सदस्या डॉ. प्रतिभा तेटू यांनी केले. या प्रसंगी जेष्ठ नाट्यकलावंत नाना देशमुख, अशोक बोंडे , विलास थोरात, कवी-साहित्यिक जयश्री कुलकर्णी, शीतल राऊत, आबासाहेब कडू, प्रणाली देशमुख, दिनेश राऊत,माया वासनिक गेडाम, पुष्पाताई बोरकर, शिक्षणतज्ञ पंडित पंडागळे, सामाजिक कार्यकर्त्या डाँ. निशा शेंडे , नरेश काठोले, गणेश भोयर, अरूण बुंदेले, कवी राजाभाऊ धर्माधिकारी प्रभृती प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रोटरी क्लबचे सचिव (एडमीन) श्रीकांत मानकर यांनी केले.

Sharing

Visitor Counter