डॉ.सारिका क्षीरसागर, मीना तुपे,प्रा.उमा जगतकर,आयेशा शेख, यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

डॉ.सारिका क्षीरसागर, मीना तुपे,प्रा.उमा जगतकर,आयेशा शेख, यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड
बीड/प्रतिनीधी
सामजिक, सांस्कृतीक, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता आणि खेळ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा प्रभास केसरी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार-२०२२ देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे दैनिक प्रभास केसरीचे मुख्य व्यवस्थापक प्रा. डॉ. रमेश लांडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सदर पुरस्कार दैनिक प्रभास केसरीच्या पहील्या वर्धापन दिनानिमित्त एस. के. सभागृह,अनविता हॉटेल, जालना रोड बीड येथे दिनांक ५ जुन २०२२ रोजी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात माजी मंत्री ना. जयदत्तजी (अण्णा) क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते दिला जाणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि स्त्रीला मातृत्वाचा अधिकार मिळवून देणाऱ्या डॉ. सारिकाताई योगेश क्षीरसागर, त्वचारोग आणि बालरोग तज्ञ डॉ. जितीन गोरख वंजारे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मदनलाल पांढरीनाथ लाड, प्रशासकीय सेवेत राहून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणाऱ्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक मीनाक्षी भिवसेन तुपे, कृषी अधिकारी श्रीमती शोभा पंढरीनाथ वामन (फाजगे), पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असे समजून काम करणाऱ्या दैनिक सूर्यदयच्या उपसंपादक आयशा शेख, महाराष्ट्र राज्याच्या सांघटनात्मक पातळीवर काम करणारे कास्ट्राईब संघटनेचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत जी. जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजेंद्र गाडेकर आणि शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तुलसी इंग्लीश स्कूलचे प्राचार्य उमा बालाजी जगतकर यांना सादर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या सोबत दैनिक प्रभास केसरीला महाराष्ट्रात नावलौकक मिळवून देणारे उपसंपादक कैलास ढमणे, मुंबई विभागीय संपादक महेश तारमळे, उस्मानाबाद जिल्हा संपादक प्रदीप यादव, बीड जिल्हा संपादक अण्णासाहेब साबळे, पालघर जिल्हा संपादक शेखर पवार यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तम पवार, महीला आयोग सदस्य ऍड. संगीता चव्हान, मा. नगरसेवक प्रेमलता आत्माराम चांदणे, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुंबई पत्रकार संघाचे प्रदेशाअध्यक्ष मा. वसंत मुंडे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बंधू - भगिनी सह सामाजिक कार्यकर्ते, राजकीय मंडळी आणि मित्र परिवाराने उपस्थीत राहावे असे आवाहन दै. प्रभास केसरीच्या संपादक सौ. अनुप्रिता मोरे यांनी केले आहे.








