लिंबागणेश येथे होळकर चौकाचे अनावरण
Beed

लिंबागणेश येथे होळकर चौकाचे अनावरण
बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व सुभेदार मल्हारराव होळकर चौकाचे अनावरण मंगळवार ३१ मे २०२२ रोजी जयंतीनिमित्त करण्यात आले.
यावेळी सरपंच स्वप्नील गलधर, डॉ गणेश ढवळे, राजेभाऊ गिरे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बालासाहेब जाधव, रवि निर्मळ, सुरेश निर्मळ, शेख समीर, प्रा,राजेंद्र गाडेकर, प्रा, चादर, प्रा,मनोज सिराम, डॉ, किरण सोनसले आदी उपस्थीत होते. लिंबागणेश परिसरातील विद्यार्थ्याची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्यास पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यास आर्थिक मदत म्हणून पाच हजार एक रूपये देणार असल्याचे महादेव राहिंज यांनी सांगीतले.
--








