शाळांना जूनपासून सीसीटीव्ही बंधनकारक,शिक्षणमंत्र्यांचे आदेश ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणी मान्य-डाॅ.गणेश ढवळे

शाळांना जूनपासून सीसीटीव्ही बंधनकारक,शिक्षणमंत्र्यांचे आदेश ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणी मान्य-डाॅ.गणेश ढवळे
बीड/वार्ताहर
मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळेत सुस्थितीत व देखभाल करण्यात येत असलेले सीसीटीव्ही बसविण्यात यावेत व दिरंगाई करणारांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे शिक्षणमंत्री यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वी जूनपासून सीसीटीव्ही बसविण्यात यावेत याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात एकुण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ६५ हजार शाळा असुन त्यापैकी सद्यस्थितीत १६२४ शाळांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरीत शाळेमध्ये जिल्हा नियोजन समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी,सीएसआर फंड,लोकसहभागातुन किंवा लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतुन करण्याबाबत सुचना देण्यात आल्याचे नमुद केले आहे.
आंदोलनानंतर उपआयुक्तांचे सीईओ जिल्हापरिषद बीड यांना सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश-डाॅ.गणेश ढवळे
दि.११ एप्रिल रोजी मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळेत सीसीटीव्ही बसविण्यात यावेत यामागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते यांची दखल घेऊन उपआयुक्त (आस्थापना)औरंगाबाद विभाग सुरेश बेदमुथा यांनी मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांना निवेदनाच्या अनुषंगानेच कार्यवाहीबाबत निर्देश दिले होते. आंदोलनात शेख युनुस च-हाटकर
,शिक्षण हक्क आधिकार कार्यकर्ते मनोज जाधव,बाळासाहेब मोरे,मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन,राजेंद्र आमटे,अक्षय माने,नितिन सोनावणे आदिंनी सहभाग घेतला होता.








