माजलगाव येथे गोळीबार करणारी पाच आरोपी २४ तासात जेरबंद करण्यास यश

माजलगाव येथे गोळीबार करणारी पाच आरोपी २४ तासात जेरबंद करण्यास यश
बीड/वार्ताहर
पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण हद्दीत तालखेड शिवारात दिनांक 30/05/2022 रोजीचे सांयकाळी पाच वाजण्याचे दरम्यान तालखेड गावात ऊस तोड मजुराचा कार्यक्रम चालु होता . त्या ठिकाणी एका पांढऱ्या रंगाची गाडी एम.एच .42 एच 7084 या स्कॉर्पिओ गाडीमध्ये संतोष उत्तम गायकवाड , दिलीप शिंदे व त्यांचे तीन साथीदार हे आले व त्यांनी मजुरांचे कार्यक्रम ठिकाणी शिवीगाळ केली . त्यांना समजवण्यासाठी सखाराम साहेबराव जाधव हा गेला असता संतोष गायकवाड याने सखाराम साहेबराव जाधव यांना जिवे मारण्याचे उद्देशाने आरोपीने त्याचे ताब्यात असलेल्या पिस्टल मधुन एक गोळी सखाराम जाधव यांचेवर फायर करून गंभीर जखमी केले . संतोष गायकवाड सदर ठिकाणावरून पळत जात असतांना गावकऱ्यांनी त्यास पकडून ठेवले . त्याचे साथीदार दिलीप सुधाकर शिंदे , बल्ल्या उर्फ श्रीकृष्ण सुखदेव गंधारे , सुरज उर्फ सुरेश रमेश मोरे , अशोक रमेश मोरे असे ( फरार ) आरोपीविरुध्द पो.स्टे . माजलगाव ग्रामीण 124/2022 कलम 307,143 , 147 , 148 , 149,323,504,506 भादंवि सह 3/25 , 27 भारतीय शस्त्र अधिनियम सह 4 ( i ) ( 1 ) ( s ) , 3 ( 1 ) ( r ) ( s ) अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये दिनांक 31/05/2022 रोजी गुन्हा दाखल झाला आहे . संतोष उत्तम गायकवाड यास गावकऱ्यांनी पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले . त्याचेकडुन गुन्हयात वापरलेले एक गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस , दोन कत्त्या व एक चाकु व गुन्हयात वापरलेली वाहन स्कॉर्पिओ असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . तसेच आरोपी नामे दिलीप सुधाकर शिंदे यास पो.स्टे . माजलगाव ग्रामीण यांनी अटक केली आहे . सदर घटनेच्या अनुषंगाने मा . पोलीस अधीक्षक साहेब , बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला फरार तीन आरोपीतांना तात्काळ अटक करण्यासाठी आदेशीत केले होते त्यावरून पो.नि.स्था.गु.शा.यांनी स्वतः घटनास्थळी भेट देवून फरार तीन आरोपीतांचा शोध घेत असतांना पो.नि.स्था.गु.शा.यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , सदर गुन्हयातील आरोपी हे औरंगाबाद जिल्हयातील थेरगाव पाचोड येथे आहे . अशी माहिती मिळाल्यावरून स्वत : व स्टाफ सह थेरगाव पाचोड येथे जावून आरोपीचा थेरगाव वरून वडीगोद्री मार्गे पाठलाग करुन अंबड ते बीड रोडवरील पिटोरी सिरजगाव फाटया जवळ सापळा रचून आरोपी नामे 1 ) बल्ल्या उर्फ श्रीकृष्ण सुखदेव गंधारे , वय -25 , रा.खंडोबा मंदिर , माजलगाव , 2 ) सुरज उर्फ सुरेश रमेश मोरे वय 21 , रा.शिवनगाव ता . घनसांगवी जि.जालना , 3 ) अशोक रमेश मोरे , वय 23 रा.शिवनगाव ता.घनसांगवी जि.जालना यांना ताब्यात घेवून पो.स्टे . माजलगाव ग्रामीण येथे पुढील तपासकामी हजर करण्यात आलेले आहे . सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे .
