३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी करा-प्रकाश भैय्या सोनसळे

३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी करा-प्रकाश भैय्या सोनसळे
धनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य
आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा मा प्रकाश भैय्या सोनसळे यांनी अणेक दिवसांपासून आयोजन करत आहेत.
आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन मा.ज्ञानेश्वर गाडेकर सर व सुंदरराव काकडे मंडलाधिकारी हस्ते करण्यात आले.
राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा.महादेव हजारे ग्रामसेवक यांच्या हस्ते करण्यात आले. तर राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन गणेश सानप, बनसोडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद ,महानगरपालिका,व शासकीय कार्यालये या ठिकाणी जयंती साजरी करण्यात यावी असे बोलताना सांगितले.
यावेळी शितल मतकर,पवन गावडे, विशाल प्रभाळे, सुधाकर वैद्य, सुभाष महानोर,कसपटे भैय्या,प्रभाळे भैय्या,वैध भैय्या, आदी समाज बांधव उपस्थित होते.








