मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंर्तगत ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

Beed

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंर्तगत ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 बीड/वार्ताहर 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP हा उदयोग विभाग, महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम असुन नुकतीच सदर योजना mission scheme  म्हणून  मा. मुख्यमंत्री यांनी घोषित केलेली आहे. सन 2022-23 या वर्षात सदर याजनेत बीड जिल्हयासाठी दोन हजार युवक - युवतींचे कर्ज प्रकरणे वित्तीय संस्थांना पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेत सर्व शासकीय विभांगाचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका असणार आहे.

योजनेची ठळक वैशिष्टे:-

 कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेल्या स्थानिक रहिवाशी त्यांचे वय 18 वर्ष  पुर्ण अधिकतम मर्यादा 45 वर्ष ( अनु. जाती, जमाती/ महिला/ अपंग/ माजी सैनिक यांचेसाठी 5 वर्ष शिथील ) पात्र असतील. अर्जदार व्यक्तीने PMEGP अथवा तत्सम केंद्र अथवा राज्य शासनाच्या अन्य विभागाकडिल/ महामंडळाकडिल अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

शैक्षणिक पात्रता:-

रु. 10.00 लाखावरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण,  रु. 25.00 लाखावरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण असून सेवा उदयोग व्यवसायासाठी जास्तीत जास्त रु. 10.00 लाख व उत्पादन व्यवसायासाठी रु. 50.00 लाख मर्यादेपर्यंत अर्ज दाखल करता येईल. ( प्रकल्प किमती अंर्तगत इमारत खर्च 20 टक्के , मशिनरी व साहित्य 50 खेळते भांडवल 30 टक्केच्या मर्यादेत असावे )

कर्ज प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

फोटो, आधार कार्ड, जन्म दाखला/ डोमेसाईल प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा  दाखला, शैक्षिणिक पात्रता मार्कशिट, हमीपत्र योजनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रकल्प अहवाल (नमूना योजनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.) जातीने प्रमाणपत्र (अनु. जाती, जमाती असल्यास ) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र (अपंग किंवा मरती सैनिक असेल तर ) REDP /EDP किंवा कौशल्या विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र  पॅन कार्ड ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचेकडील लोकसंख्या दाखला ( 20 हजारच्या आत लोकसंख्या असल्यास) पार्टनर शिप बचत गट कंपनी असेल तर नोंदणी प्रमाण्पत्र, अधिकार पत्र, घटना

बॅक कर्ज/ आर्थिक सहाय्य: 

प्रवर्ग

घटकाची स्वगुंतवणूक

देय अनुदान (मार्जिन मनी)

बॅक कर्ज

शहरी

ग्रामीण

शहरी

ग्रामीण

अनु.जाती,जमाती/ महिला/ अपंग/ माजी सैनिक

5%

25%

35%

70%

60%

उर्वरित प्रवर्ग

10%

15%

25%

75%

65%

 

 

 

 

 

 

 

               ही योजना संपूर्णत: ऑनलाईन असून पेपरलेस आहे. योजनेचे संकेतस्थळ  http://www.maha-cmegp.gov.in ला भेट दिली असता मेन्यू टॅब मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत व्हिडीओ, टयुटोरिअल, योजनेच्या मार्गदर्याक सूचना, शासन निर्णय उपलब्ध करण्यात आले आहेत.

               सदर योजनेचा प्रचार प्रसार करुन बापल्या विभांगातर्गत कार्यरत टीम, प्रशिक्षण संस्था, एनजीओच्या माध्यमातून प्रशिक्षित व गरजू युवक युवती यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी व रोजगार निर्मिती तसेच जिल्हयास दिलेला लक्षांक पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती महाव्यवस्थापक जिल्हा उदयोग केंद्र, बीड यांनी केली आहे.

 

Sharing

Visitor Counter