श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथे कॅम्पस प्लेसमेंटद्वारे आठ विद्यार्थ्यांची झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये निवड

Beed

श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथे  कॅम्पस प्लेसमेंटद्वारे आठ विद्यार्थ्यांची झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये निवड

आष्टी/प्रतिनिधी

आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी संचालित ,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सलग्न,श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी ,येथे दिनांक २५/०५/२०२२ रोजी कृषी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल द्वारे झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत अग्रिकल्चर फिल्ड ऑफीसर पदाकरीता मुलाखती घेण्यात आल्या. कंपनीच्या कॅम्पस इंटरव्ह्यू करिता महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षांत शिक्षण घेत असणाऱ्या २८ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. उमेदवार निवड प्रक्रिया  वेगवेगळ्या तीन टप्प्यात घेण्यात आली. प्रथम नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. यानंतर नोंदणीकृत उमेदवारांचे ग्रुप डिस्कशन  आयोजन करण्यात आले होते. सरतेशेवटी सर्व उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्व परीक्षांच्या सरासरी मूल्यांकन करून महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची अंतिम  निवड अग्रिकल्चर फील्डऑफिसर या पदासाठी  करण्यात आली. निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे, लटके सागर विष्णू, पाटील विशाल दादासाहेब, गाजरे विनायक भगवान, लटके निखिल रामराज, मुळीक संग्राम हणमंत, इंदलकर प्रदुमन बाळासाहेब,निर्मळ शुभम शिवाजी व नेटके शुभम काशिनाथ.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. श्री. भीमराव आनंदराव धोंडे, सह सचिव डॉ.अजय भीमराव धोंडे,  प्रशासकीय अधिकारी डॉ.राऊत डी.बी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आरसुळ एस. आर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या उपक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी प्लेसमेट विभाग प्रमुख इंजी. जाधव प्रविण नामदेव, उपविभागप्रमुख प्रा.साबळे महेश विक्रम, प्रा. सुजाता लक्ष्मण बनकर, डॉ.अजबे एम.ए, प्रा.तांबोळी आय. एम, प्रा.गुंजाळ बी.आर, प्रा. काळे पी.आर, श्री. क्षेत्रे डी.पी यांनी परिश्रम घेतले. या कॅम्पस इंटरव्ह्यू साठी झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एरिया सेल्स मॅनेजर या पदावर काम करणारे श्री. संदीप माळी, श्री. महेंद्र बरबडे व श्री. राहुल शेडगे यांचा समावेश होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड केल्याबद्दल प्राचार्य यांनी निवड समितीतील सर्व सदस्यांचे आभार मानले.

Sharing

Visitor Counter