सीसीआयच्या कापूस केंद्रावर शेतकऱ्यांची ग्रीडीग च्या नावाखाली अडवणूक, तर दलालाकडून शेतकऱ्यांची लूट सीसीआय ग्रेडरवर व दलाला वर कारवाई करण्याची मनसेची मागणी

Beed

सीसीआयच्या कापूस केंद्रावर शेतकऱ्यांची ग्रीडीग च्या नावाखाली अडवणूक, तर  दलालाकडून शेतकऱ्यांची लूट   सीसीआय ग्रेडरवर व  दलाला  वर कारवाई करण्याची मनसेची मागणी

परतूर प्रतिनिधी /संजय खनपटे
 
जालना जिल्ह्यातील सीसीआय कापसाला प्रति क्विंटल ५ हाजार १०० रुपये भाव देते. खाजगी जिनिंग मालक प्रतिक्विंटल २८०० ते ३००० रुपयात खुप कमी भावात खरेदी करतात. म्हणून सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर संथ गतीने खरेदी चालू आहे का ? याचा फायदा खाजगी जिनिंग मालकांना होणार, सीसीआय व खाजगी कापूस खरेदी करणाऱ्या जिनिंग मालकांचे षडयंत्र मिलीभगत.थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होणार या नंतर सीसीआय कापूस खरेदी करणार किंवा नाही ? जालना जिल्ह्यातील कापूस सीसीआय मार्फतच खरेदी करण्या बाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी विभागीय आयुक्त यांना दिले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, 
               जालना जिल्ह्यातील सीसीआय कापुस खरेदी ग्रेडर व अधिकारी आणि खाजगी कापूस खरेदी जिनिंग मालक यांच्यात मिलीभगत. सीसीआय कापूस खरेदी करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा १-२-३. तीन प्रतीच्या कापसाचे भाव ठरवलेले आहेत. याच ग्रिडींगच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने ५० क्विंटल कापूस सीसीआय खरेदी केंद्रावर आणला तर त्यामध्ये २० क्विंटल कापूस त्या शेतकऱ्यांना परत केल्या जातो. कारण असते कापूस खराब आहे. म्हणून या मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालू आहे.तो गैरव्यवहार रोखण्यासाठी खाजगी कापूस खरेदी बंद करून  संपूर्ण कापूस सी‌सीआय ने सरसगट खरेदी करावा   कारण या वर्षी कोरोना सारख्या साथीच्या रोगांमुळे शेतकरी अडचणीत आहे.परत सीसीआय.मुळे कापूस विक्रीचे संकट शेतकऱ्यांना समोर उभे आहे, सीसीआय.कापूस खरेदी केंद्रावर (एफएक्यू ) दर्जाचा नावाखाली फार मोठा घोटाळा ग्रेडर व अधिकारी करीत आहेत.बघा कसा होतो घोटाळा सीसीआय ग्रेडर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना म्हणतात तुमचा चांगल्या प्रतीचा कापूस नाही. म्हणून शेतकऱ्यांना वापस पाठवल्या जाते.मग हा शेतकरी तोच कापुस खाजगीत विक्री करतो.मग तोच खाजगीत विक्री केलेला कापूस परत दलालामार्फत सी.सी.आय केंद्रावर विक्रीसाठी येतो.अशा प्रकारामुळे  शेतकरी हैराण झाले आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील खासगी जिनिंग मालकाचे कापूस खरेदी बंद करुण.या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस सरसगट खरेदी करण्या बाबत,जिल्हा उपनिबंधक (डी डी आर जालना) यांना आदेश द्यावेत, कारण जालना जिल्ह्यात अंदाजे जवळपास लाखाच्या घरात कापूस विक्रि अभावे पडून आहे.अशावेळी सीसीआय.ची एफएक्यु हि जाचक अटी शितील करून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सरसगट २ क्रमांकाचा भाव देऊन कापसाची खरेदी करण्यात यावी.या मुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता अनेक वर्षे कोरडा दुष्काळ होता.या दुष्काळामुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. या मध्येच कोरोना सारख्या साथीच्या रोगांमुळे शेतकरी संघर्ष करीत मोठ्या अडचणीला तोंड देत असतांनीच परत कापूस खरेदी सी‌.सी.आय. ने कापूस खरेदी केंद्रावर एकच प्रतीच्या भावात क्रमांक ( २ ) दोनचा दर्जा देऊन कापसाची खरेदी केली जावी. या लॉकडाऊन काळात ७० दिवसात कापसाचे अंदाजे वजनात खुप घट झाली.कारण कापसाचे वजन मार्च. एप्रिल. मे. खूप ऊन असते या (टेंपरेचर) मुळे कापसाचे वजन घटण्याचे प्रमाण वाढत असते.या ७० दिवस वजन घटल्यामुळे शेतकर्‍यांचे आधीच नुकसान झालेली आहे, म्हणून अशावेळी सी.सी.आयने एकएक्यु दर्जा हि आट शिथील करून सरसगट क्रमांक २ (ग्रेड २) भाव देऊन  कापूस खरेदी करण्यात यावी. करण जालना जिल्ह्यातील आठही  तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे कापूस विक्रि आभावी  पडून राहील अशी भीती वाटू लागली आहे. कापूस खरेदी केंद्रावर सध्या सीसीआय आंदागोंदी कारभार करीत आहे. या सीसीआय.धिकार्‍यांचे व खाजगी व्यापाऱ्यांचे मोठे कनेक्शन आहे.कारण सीसीआय. ग्रेडर चांगल्या प्रतीचा कापूस नाही म्हणून त्या शेतकऱ्याला खरेदी केंद्रावरून परत पाठवतात. मग तोच शेतकरी खाजगी कापूस खरेदीदार व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करते.मग सीसीआय.चा प्रति क्विंटल ५ हाजार १०० रुपये भाव देत आहे. सी.सी.आय.ने परत केलेला कापूस खाजगी व्यापारी २८०० ते ३००० रुपये पर्यंत खरेदी करून तोच व्यापारी कापूस परत सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर विक्रीसाठी येतो. कापूस खरेदी करण्यास सी.सी.आय. ग्रेडरने नकार देणे. व खाजगी कापूस खरेदी करणाऱ्या खरेदीत २ हजार रुपये भावाचे फरक आहे. सीसीआय कापूस खरेदी संथ गतीने का चालू आहे. कापूस खरेदी असेच संथगतीने खरेदी चालू राहिली तर थोड्या दिवसात पावसाला सुरुवात होईल. नंतर  सीसीआय कापूस खरेदी करणार का बंद करील या बाबत शेतकरी चिंतेत आहे. नंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे विक्रि  अभावी  कापूस पडून राहणार तोच कापूस शेतकरी खाजगी जिनिंग मालकाला कमी भावात विक्री करणार कारण शेतकऱ्यांकडे दुसरा पर्यायही नाही हे तर खरे मिलीभगत षड्यंत्र आहे?  असाही आरोप दिलेल्या निवेदनात करण्यात आलेला आहे.
जालना जिल्ह्यातील, सीसीआय ,जिनिंग मालक व दलाल यांनी संगणमत करून शेतकऱ्यांची लुटालूटिचे षड्यंत्र चालू आहे का ?.थोड्या दिवसात पाऊस पडल्यानंतर सीसीआय कापूस खरेदी करणार किंवा नाही? परंतु खासगी जिनिंग मालक नक्कीच कापुस खरेदी करतील. म्हणून सीसीआयची कापूस खरेदी संथगतीने चालू आहे . सीसीआय कापूस खरेदी केंद्रावरील ग्रेडर व अधिकारी तसेच खाजगी कापूस खरेदी करणारे जिनिंग मालक दलाल यांनी संगणमत करून शेतकर्‍यांना लुटण्याचे नियोजनबद्ध कट रचुन लुट होणार आहे. म्हणून जालना जिल्ह्यातील खाजगी कापूस खरेदी बंद करा.व सीसीआय कापूस खरेदी केंद्रावरील. ग्रेडर व संबंधित अधिकार्‍यांवर चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करुण शेतकऱ्यांना न्याय द्यावा. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस सीसीआय मार्फतच खरेदी करावा   असे दिलेल्या निवेदनात प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी म्हटले आहे.

Sharing

Visitor Counter