शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हापरिषद बीड यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ!

शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हापरिषद बीड यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ!
लाॅकडाऊन च्या अशा नाजूक परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार उपोषणास
बीड/प्रतिनिधी
शहरातील शैक्षणिक संस्था " अंजुमन इशाते तालीम बीड" द्वारा संचालित मिल्लिया माध्यमिक शाळा बीड व मिलिया माध्यमिक शाळा अंबाजोगाई येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले व गेल्या पाच ते नऊ वर्षांपूर्वी नियुक्त असलेले चार शिक्षक व एक ग्रंथपाल यांचे शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद बीड व वेतन अधीक्षक बीड यांच्या हलगर्जीपणामुळे व जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे शालार्थ आयडी उपलब्ध न झाल्याने वेतनाचा भयानक प्रश्न निर्माण झाला व सदरील शिक्षकांवर सहकुटुंब उपासमारीची वेळ आली म्हणून या शिक्षकांवर लाॅकडाऊन च्या अशा नाजूक परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची वेळ आलेली आहे.
याबाबत सविस्तर असे की बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी उर्दू शैक्षणिक संस्थाअंजुमन इशात तालीम बीड येथील मिलिया माध्यमिक शाळा बीड व मिलिया माध्यमिक शाळा अंबाजोगाई येथे कार्यरत व गेल्या पाच ते नऊ वर्षांपूर्वी नियुक्त असलेले सहशिक्षक पठाण रियाज खान सरवर खान, शेख मसरुर अन्वर शेख रहीम ,श्रीमती शेख इशरत परविन शफीउद्दीन ,श्रीमती लूबना शाहीन शेख नजीर अहमद आणि ग्रंथपाल श्रीमती शेख अलमाज निजामुद्दीन हे आपले कर्तव्य शाळेत उत्कृष्टरित्या बजावीत आहे यांना चार वर्षापूर्वी मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची बदली मान्यता सुद्धा असून जुन 2019 मध्ये शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट करण्यासंदर्भात प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे सदरील प्रकरणात माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बीड व मा. वेतन अधीक्षक बीड यांनी सदरील कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलेले आहे शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य शासन निर्णय दिनांक 3 जुलै 2017 नुसार अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थाच्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट करण्याची जबाबदारी माननीय शिक्षक उपसंचालक यांची आहे परंतु सदरील प्रकरणात सूचनेचे पालन करून सर्व अटींची पूर्तता करून मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या सेवेत सादर केलेले आहे तसेच वेळोवेळी पाठपुरावा करून मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सदरील प्रस्तावा विषयी माननीय उपसंचालक यांना आवश्यक ते कागदपत्र सादर केलेले नाही ,यामुळे या कर्मचाऱ्यांवर सहकुटुंब उपासमारीची वेळ आले असून सध्या covid-19 मुळे देशभरात लॉर्ड चालू आहे अशा नाजूक परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना त्यांच्यामुळे वेतनापासून वंचित राहावे लागत आहे , येणाऱ्या आठ दिवसात या शिक्षक कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी प्रदान न केल्यास व वेतन सुरू न झाल्यास अपरिहार्य कारणास्तव माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असण्याविषयी लेखी पत्र या सर्व पीडित शिक्षकांनी माननीय जिल्हाधिकारी बीड यांना सादर केले आहे . जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक च्या या दुर्लक्षामुळे व जाणून-बुजून केली जात असलेल्या दिरंगाई मुळे हे शिक्षक सहकुटुंब भयानक परिस्थितीतून जात आहे .याची जाणीव घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी विनंती संबंधित शिक्षकांकडून करण्यात आलेली आहे.








