मुख्याधिकारी डाँ.सागर घोलप यांच्या जाहीर आवाहनाला अंबडकरांचा प्रतिसाद

Beed

मुख्याधिकारी डाँ.सागर घोलप यांच्या जाहीर आवाहनाला अंबडकरांचा प्रतिसाद

बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या माहिती साठी येताहेत दररोज फोन काँल

 
अंबड़/अक्षय गोरुले

अंबड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाँ.सागर घोलप यांनी अंबड शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनाला कळावी याकरिता एक हेल्पलाईन नंबर देत शहरातील सर्व भागात रिक्षाच्या माध्यमातून जाहिर आवाहन केले होते अंबड शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, सध्या महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन कालावधीमध्ये विविध ठिकाणी अडकून पडलेले नागरिक यांना आपआपल्या गावी जाण्याची सवलत दिली आहे. सध्या अंबड शहरामध्ये बाहेरील जिल्ह्यातून राहण्यासाठी आलेले अनेक नागरिक वैद्यकीय तपासणी न करता छुप्या पद्धतीने घरात रहात असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी या नागरिकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
बाहेरील जिल्ह्यातील अंबड शहरामध्ये नव्याने आलेले कोणीही नागरिक विना वैद्यकीय तपासणी रहात असल्याचे आढळून आल्यास सदर नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय यांचे विरुद्ध साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार गुन्हा दाखल करून फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, तसेच सर्व कुटुंबियांना 14 दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल याची गंभीर नोंद घ्यावी.
तसेच अंबड शहरातील सर्व जागरुक नागरिक यांना आवाहन करण्यात येते की, बाहेरील जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती आपल्या शहरांमध्ये किंवा परिसरामध्ये विना तपासणी छुप्या पद्धतीने येऊन राहात असल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास आपण तातडीने नगरपरिषदेच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. हेल्पलाइन नंबर 880 550 0867 डॉ. सागर घोलप मुख्याधिकारी अंबड नगरपरिषद.
या जाहीर आवाहनाला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देत बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती निर्भयपणे देत आहेत मुख्याधिकारी डाँ. घोलप यांनी राबवलेले सर्व उपक्रम कोवीड-19 प्रतिबंधात्मक कामात उपयोगी ठरलेले आहेत.

Sharing

Visitor Counter