बीड शहरातील तिहेरी हत्याकांड ;आई सोबत दोन मुलांच खुन!

Beed

बीड शहरातील तिहेरी हत्याकांड ;आई सोबत दोन मुलांच खुन!

बीड/प्रतिनिधी

शहरातील पेठ बीड या भागात असलेल्या शुक्रवार पेठमध्ये आज दुपारी एका महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने बीड शहरातील खळबळ उडाली आहे. मयताचे संगीता संतोष कोकणे(वय 31) ,संदेश संतोष कोकणे(वय 10) हे दोन मृतदेह रक्तबांबळ अवस्थेत आढळून आले सदरील महिलेच्या डोक्यात भारदार वस्तूचा मारा करत तिचा खून करण्यात आला तर मयुर संतोष कोकणे (वय7) याचा पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला आहे लेकरांना पाण्यात बुडवून जीवंत मारल्याचे सांगण्यात येते.
शहरात हत्याकांड घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

घटना स्थळी पेट बीड  पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत सदरील खुन कोणत्या कारणाने झाला अद्याप समजू शकलेले नाही.

Sharing

Visitor Counter