श्री. श्री. रविशंकर कोरोना संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील सरपंचांना मार्गदर्शन करणार

श्री. श्री. रविशंकर कोरोना संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील सरपंचांना मार्गदर्शन करणार
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
अध्यात्मिक गुरु श्री. श्री. रविशंकर कोरोना सारख्या संकटात महाराष्ट्रातील सरपंचांना दिनांक २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजता थेट संवाद साधून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी दिली आज कोरोना सारख्या संकटात सर्व जग बुडाले असताना आणि कोरोना ने सगळीकडे अगदी धुमाकूळ घातल्याने सर्व मानवजातीला निसर्गाच्या कोपास सामोरे जावे लागत आहे या मुळे सर्वजण विचारात पडलेले असताना लोक डाऊन जाहीर झाल्यापासून अध्यात्मिक गुरु श्री. श्री. रविशंकर यांनी भारत भर आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून मदत केलेली आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत गुरुदेव श्री. श्री. रविशंकर दररोज दिवसातून दोन वेळेस ध्यान घेत असून यात १५३ देशातील वीस ते पंचवीस लाख लोक सहभागी होत आहेत. ध्यानामुळे मन शांती, मनशक्ती आणि शारीरिक रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याचा लाखोंचा अनुभव आहे. भारतातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवराबरोबर संवाद साधून भविष्यात येणार्या आव्हानांना सामाजिक आणि आर्थिक बदलांना सकारात्मक पद्धतीने स्वीकारून आर्थिक प्रगती साधून सामाजिक सलोखा कसा वृद्धिंगत करता येईल याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. सरपंच सर्व गावाचा गाव गाडा एका खांद्यावर वाहणारा कोणाकडून कोणतीही अपेक्षा न बाळगणारा अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करणारा गावातून जनतेचे आणि प्रशासनाचे अधिकाऱ्यामार्फत अपेक्षांचे ओझे वाहणारा लोकशाहीतील सर्वात शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा असा घटक होय म्हणून सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी अपेक्स मेंबर तसेच श्री. श्री. रुलर डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रस्ट आर्ट ऑफ लिव्हिंग'चे विश्वस्त विजय हाके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक व विश्वस्त सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे अविनाश बी. आव्हाड यांच्या पुढाकाराने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत झूम मीटिंग च्या माध्यमातून अध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर दिनांक २५ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता थेट संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत या चर्चासत्रात सरपंच परिषदेचे कोअर कमिटी प्रमुख अविनाश जी आव्हाड, सरचिटणीस विकास जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ राणीताई पाटील सरपंच भुयेवाडी कोल्हापूर, महिला उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात सरपंच पिंपरी गवळी, दासराव हंबर्डे सरपंच गुंडेगाव तथा जिल्हाध्यक्ष नांदेड हे सहभागी होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण १५० देशांमध्ये होणार आहे साधारण पंधरा लाख प्रेक्षक याचा लाभ घेणार आहेत याचे युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा प्रसारण करण्यात येणार आहे ग्रामीण भागातील सर्व सरपंच सदस्य ग्रामस्थ युवा महिला यांना यूट्यूब च्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी दिली.








