अल्पसंख्याक पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे मानधन इद पूर्वी वाटपाने आनंद

Beed

अल्पसंख्याक पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे मानधन इद पूर्वी वाटपाने आनंद

बीड/प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभाग मंञालय मुंबई च्या वतीने अल्पसंख्याक समाजातील बारावी उत्तिर्ण विद्यार्थीसाठी मुख्य पोलीस भरती मध्ये पाञ होण्याच्या हेतूने शासनाने दर वर्षी अल्पसंख्याक पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन निवडक संस्थे मार्फत घेण्यात येते. सन 2019 चे सदरील प्रशिक्षण आझाद हिंद बहूऊद्देशिय सेवाभावी संस्था म. कामखेडा ता जि बीड या संस्थेने उत्कृष्टरित्या पूर्ण केलेले  आहे. 
    सदर प्रशिक्षणाचा गणवेश किट, शैक्षणिक साहित्य, क्रिडा साहीत्य, अल्पोपहार खर्च संस्थेने केला होता. सदर प्रशिक्षणास मासीक पंधराशे असे दोन महीन्याचे तीन हजार रुपये काल संस्थेच्या बॅंक खात्यावर जमा होताच आज सदरील प्रशिक्षणार्थी यांना एआयएमआयएम चे जिल्हाध्यक्ष अड शेख शफीक भाऊ, माजी न प सभापती खुर्शिद आलम, भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य अड सय्यद खाजा,अल्पसंख्याक कल्याण समिती सदस्य,मोहम्मद अझहरुद्दीन (ए एस् गोलु) तसेच संस्थेचे अध्यक्ष पठाण नईम,सचिव शेख मुसा, सहसचिव फैसल शेख, प्रशिक्षक सिद्दीकी समीओद्दीन व रज्जाक शेख  याच्या हस्ते रमजान ईद पूर्वी वाटप करण्यात आले. ईद पूर्वी मानधन मिळाल्याने सर्व प्रशिक्षणार्थीं यांनी आनंद व्यक्त केरीत प्रेशासन व संस्थेचे आभार मानले.

Sharing

Visitor Counter