सय्यद उजेर चा पहिला रोजा पूर्ण

Beed

सय्यद उजेर चा पहिला रोजा पूर्ण

बीड/प्रतिनिधी 

बीड -- इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात 'रोजा'ला विशेष महत्त्व आहे.या महिन्यात लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच पहाटे सहेरी करून रोजा (उपवास) ठेवतात.बीड  शहरातील झम झम कॉलनी  येथील  सात  वर्षीय  सय्यद उजेर  सय्यद अझहर  या लहान मुलाने  आपल्या जीवनातील पहिला रोजा शनिवार दि.२3  मे रोजी पूर्ण केला.पहाटे चार वाजता उठून आपल्या कुटुंबियांसोबत सय्यद उजेर  याने सहेरी केली होती.मे महिन्याचे कडक ऊन अशात दिवसभर अन्न पाण्या शिवाय हा रोजा त्याने ठेवला.सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबियांसोबत त्याने रोजा इफ्तारी केली.कमी वयात सय्यद  उजेर  याने रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात  आहे.

Sharing

Visitor Counter