युवक क्रांती दल तथा शाहा अकॅडमी व वर्दी करिअर अकॅडमीत जागतीक महिला दिन साजरा

युवक क्रांती दल तथा शाहा अकॅडमी व वर्दी करिअर अकॅडमीत जागतीक महिला दिन साजरा
बीड/वार्ताहर
जागतीक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आलं.मुलगा मुलगी असा भेद न करता दोघांकडे समान नजरेने पाहिले पाहिजे. आपल्या राज्यात जास्तीत जास्त महिलांनी मोठ-मोठ्या पदावर जबाबदारीची कामगिरी पार पाडली आहे. स्त्री कुठल्याही क्षेत्रात आपली तिला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडू शकते. पण तिला समाजातून प्रोत्साहन मिळणे महत्वाचे आहे, असे प्रतिपाद आज येथील कार्यकर्त्यांनी महिला व युवकांना केले.
आज अकॅडमीत युवक व युवतींना मार्गदर्शन करताना रेखाताई क्षिरसागर यांनी सांगीतले आपल्या आई वडील सारखं आदर गुरूचा देखील केलं पाहीजे शिक्षण घेणे व चांगली नौकरी लागने हे प्रत्येक आई वडीलांनी इच्छा असते परंतु आजकालची तरूणाई नशेत आपलं आयुष्य अंधारात टाकत आहे. शिक्षण घ्या मोठे व्हा नोकरीला लागा आणि आपलं आयुष्य घडवा.
अॅड शेख शफीक भाऊ यांनी मार्गदर्शन करताना बोलले की आपण महिलांचा ईतिहास वाचला तर आपल्याला कडतो की महिलांचा योगदान किती आहे एका कुटुंबासाठी आज देखील माझ्या काही भगींनी उसाच्या फड्यात ऊसतोडणी साठी आहेत बीड हा मागसवर्गीय जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु तुम्ही तुमचा शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जा स्वताचा अस्तित्व निर्माण करा अशे मोलाचे मार्गदर्शन येथिल महिला व विद्यार्थ्यांना करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.झेबा मॅडम यांनी केले.या कार्यक्रमास उपस्थित अॅड शेख शफीक भाऊ,रेखाताई क्षिरसागर, पत्रकार संदिपजी बेद्रे सर,अॅड.आस्मा पटेल,पठाण रेहानाताई, संज्ञाताई राजपुत,अर्चनाताई सानप,आदी उपस्थित होते.








