आष्टी तालुक्यातील सहा गावे कंटेनमेंट झोन घोषित
Ashti

आष्टी तालुक्यातील सहा गावे कंटेनमेंट झोन घोषित
आष्टी/तुकाराम गणगे.
बीड प्रसार न्युज.
तालुक्यातील धनगरवाडी येथील संशयिताचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. त्यानुसार धनगरवाडीपासून तीन किमीच्या परिसरातील सहा गावे अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहेत. आष्टी तालुक्यातील धनगरवाडी (पिंपळा), पिंपळा, काकडवाडी, नांदूर, खरडगव्हाण आणि सोलापूरवाडी या सहा गावांचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात आला आहे. कंटेनमेंट झोनमधील गावे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.








