विविध मागण्यासाठी ७ मार्च रोजीे ओफ्रॉहचा मुंबई येथे महामोर्चा

Beed

विविध मागण्यासाठी ७ मार्च रोजीे ओफ्रॉहचा मुंबई येथे महामोर्चा

मोर्चात सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुनील बळवंते यांचे आवाहन

बीड/प्रतिनिधी

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि.७ मार्च रोजी मुंबई येथील अधिवेशानाच्या निमित्ताने ओफ्रॉहचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष सुनील बळवंते यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांनी  केले आहे.

 

   अन्यायकारक अनुसूचित जमाती कर्मचार, विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्रासाठी कट रचून प्रदेशाध्यक्ष शिवानंद सहरकर यांना बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र तपासण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला नव्हता., मात्र महाराष्ट्र सरकारने २३/२००० रोजी जात प्रमाणपत्र तपासण्यासाठी कायदा केला, ते संविधानाच्या विरोधात आहे. या कायद्यामुळे जबाबदार अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र अवैध ठरवले जाते. यामुळे हजारो कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अनेक कामगार कायमस्वरूपी नोकरीवर असल्याने त्यांना ११ महिन्यापासून अतिसंख्याक पदावर ठेवण्यात आले. छगन भुजबळ समितीच्या सूचनेवरून लवकरच निर्णय घ्यावा. २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयात आवश्यक त्या दुरूस्त्या करा. ११ महिन्याचे सुपरन्युमररी ऑर्डर रद्द करा आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत नोकरीत ठेवण्याचे आदेश द्या. सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी व इत्तरांना त्वरीत सेवेत सामावून घ्यावे. मृत जवानांच्या कुटूंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी द्या, नवीन नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्व कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करा, जात पडताळणी करण्याचे अधिकार २३/२००० च्या असंवैधानिक कायदा रद्द करा. अधिवास प्रमाणपत्रासाठी जात प्रमाणपत्रासाठी. प्रादेशिक कायदा १०८/१९७६ नंतरची कागदपत्रे मागवा, जात प्रमाणपत्र चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी आतापर्यंत लाखो लोकांची फसवणूक करून जात प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. या मागण्या मान्य करण्यासाठी वाशिम जिल्हयातील ३३ अनुसूचित जमातीचे अधिकारी, कर्मचारी व समाजातील लोकांना या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ओफ्रॉहचे जिल्हाध्यक्ष सुनील बळवंते यांच्यासह सुभाष: जगताप, के.पी. क्षीरसागर, भुतपल्ले, संजय ठाकूर, सुरेश ठाकूर, संजय मोरे, भाऊसाहेब तौर, श्रीमती उषा वाघमारे, तुकाराम पवार, नानासाहेब शिंदे, सुयश जगताप, धनंजय बिल्पे, रामनाथ कांबळे, विष्णू तावरे, संध्या एन्नावार, अंकुश मेढे, किसन गुंगेवाढ, विष्णु झोबर्डे, कल्याण सावध, वैभव होळकर, तात्यासाहेब जाधव, बबनराव नागलेबोणे आदीने केले आहे.

 

 

Sharing

Visitor Counter