बालेपीर प्रभाग क्रमांक १२ मधील रस्ते आ. क्षीरसागर यांच्या विशेष निधीतून बनविण्यास सुरुवात !

बालेपीर प्रभाग क्रमांक १२ मधील रस्ते आ. क्षीरसागर यांच्या विशेष निधीतून बनविण्यास सुरुवात !
समाजसेवक शेख मोहसीन, पप्पू भाई यांच्या पाठपुराव्यास यश
बीड/प्रतिनिधी
शहरातील बालेपीर भागात असलेल्या प्रभाग क्रमांक १२ मधील अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांबाबत समाजसेवक शेख मोहसीन व पप्पू भाई यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या विशेष निधीतून एकदाचे प्रभागातील रस्ते बनविण्यास सुरुवात झाली आहे.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये रस्ते आणि नाला यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असल्याने समाजसेवक शेख मोहसीन व पप्पू भाई यांनी याबाबत वेळोवेळी बीड नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. शिवाय नगरपालिकेसमोर आमरण उपोषण देखील केले होते. या सर्व बाबींची नोंद घेत बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी विशेष बाब म्हणून त्यांच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून देत या प्रभागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. छे मिनार मशिदी पासून कामास सुरुवात झाली असून लवकरच या प्रभागातील रस्ते चांगली तयार होऊन जनतेच्या सेवेत उपलब्ध होतील. तसेच रस्त्यांसोबत नाल्यांच्या कामाचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याने येथील रहिवाशांना त्रासापासून मुक्तता मिळेल. यामुळे समाजसेवक शेख मोहसीन, पप्पू भाई यांच्यासह इतरांनी आमदार क्षीरसागर यांचे आभार व्यक्त केले आहे.








