ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्था तील राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणूका घेऊ नये- विजय वडेट्टीवार, कल्याण दळे

Beed

ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्था तील राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणूका घेऊ नये- विजय वडेट्टीवार, कल्याण दळे

बीड/वार्ताहर 

सुप्रीम कोर्ट निर्णयामुळे ओबीसी वर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण स्थगित झालेले आहे राज्यातील अकोला वाशीम भंडारा पालघर नंदुरबार व नागपूर या जिल्हा परिषदेमधील पोटनिवडणुकीत काही ओबीसी आरक्षण शिवाय झाल्यामुळे या प्रवर्गावर अन्याय झाला हे घटनेच्या 73 व्या व 74 व्या घटनादुरुस्ती ने आरक्षण मिळाले होते तरीही कोर्टात योग्य मांडणी केंद्र व राज्य या दोन्ही सरकार कडून झाली नाही यापुढील निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत 

तरी ओबीसी समाजाची तीव्र भावना राज्य व केंद्र सरकार ला कळवावी अन्यथा सर्व ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बीड जिल्हा ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या वतीने आज बीड जिल्हाधिकारी कार्यलय येथे निवेदन देऊन ईशारा देण्यात आला यावेळी यावेळी प्रकाश कानगावकर जिल्हा अध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ, अर्जुन दळे प्रदेश सरचिटणीस, युवराज शिंदे, मराठवाडा अध्यक्ष,ओबीसीनेते सलीम जहांगीर, मुन्ना फड,राजू ताठे साळी समाज अध्यक्ष,मोहम्मद रफिक बागवान मुस्लिम ओबीसी अध्यक्ष ,गुलाब चव्हाण नाभिक समाज अध्यक्ष,सुग्रीव मुंडे ,दत्ता वाकसे,विशाल राऊत,मुकेश शिवगण,चंदू ठोंबरे,डॉ रमेश कैवाडे,संजय गुरव,राजेंद्र बन,शेख जाकेर,अमर ढोणे, सर्व ओबीसी परिवार उपस्थित होता.

Sharing

Visitor Counter