आरटीई प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत १० मार्च पर्यंत वाढवली

Beed

आरटीई प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत १० मार्च पर्यंत वाढवली

बोगस प्रवेश होण्याची भीती; मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालवे:- मनोज जाधव

बीड/प्रतिनिधी

आरटीई २५ टक्के अंर्तगत आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून यासाठी प्रवेश अर्जाच्या मुदतीत १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबतच आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश घेताना किमान वयोमर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.

 

         प्रवेश अर्ज करताना नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली अशा विविध प्रवेश स्तरावरील वयोमर्यादेबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेची निश्चिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आली आहे. दरम्यान बदलामुळे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या सूचना देण्यात आल्याची माहिती संचालनालायकडून देण्यात आली आहे.

 

        जिल्ह्यातील आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी २ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठीच वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे संचलनालयाच्या लक्षात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी यासाठी आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आज स्थितला जिल्ह्यात २२७ शाळांमधे १९०८ जागा करिता २८६० अर्ज दाखल झाले आहेत.

 

         गरीब विद्यार्थ्यांच्या आरटीई अंतर्गत असणाऱ्या हक्काच्या जागेवर श्रीमंत लोकांनी किंवा जे पात्र नाहीत अशा लोकांनी मोठ्या प्रमाणात कागदाची जुळवा जुळव करत डल्ला मारण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. यात मुख्यतः भाडे करारनामा आणि आधार कार्डांचा समावेश आहे. शिक्षण विभाग आणि पडताळणी समितीला वारंवार या गोष्टी लक्षात आणून देऊन देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक पाहता पडताळणी समिती ने कटाक्षाने कागदपत्रे तापाने गरजेचे आहे परंतु तसे होत नाही. तेव्हा गरिबांच्या प्रवेशावर डल्ला मारणाऱ्या धनदांडग्यांना रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा असे निवेदन आपण त्यांना देणार असल्याचे शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी म्हटले आहे.

 

 

*चौकट*

 

*राज्यातील आरटीई २०२२-२३ च्या प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे वयोमर्यादा आवश्यक*

 

( प्ले ग्रुप /नर्सरी, ज्युनिअर केजी,सिनियर केजी आणि पहिली या वर्गातील प्रवेशासाठी बालकांचे जन्म दिनांका पासून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वय मोजण्यात येईल)

 

 

प्ले ग्रुप / नर्सरी -

 

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ पासून ते ३१ डिसेंबर २०१९ जन्म दिनांक असलेले बालक प्ले ग्रुप / नर्सरी प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात त्या साठी वय ३ वर्ष ते  ४ वर्ष ५ महिने ३० दिवस असावे.

 

ज्युनिअर केजी -

वयोमर्यादा - १ जुलै २०१७ पासून  ते ३१ डिसेंबर २०१८ जन्म दिनांक असलेले बालक ज्युनिअर केजी प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात त्या साठी वय ४ वर्ष ते ५ वर्ष ५ महिने ३० दिवस असावे.

 

सिनिअर केजी -

वयोमर्यादा- १ जुलै २०१६ पासून ते ३१ डिसेंबर २०१७ जन्म दिनांक असलेले बालक सिनियर केजी  प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात त्या साठी वय ५ वर्ष  ते ६ वर्ष ५ महिने ३० दिवस असावे.

पहिली

वयोमर्यादा- १ जुलै २०१५ पासून ते ३१ डिसेंबर २०१६ जन्म दिनांक असलेले बालक पहिली वर्गाच्या प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात त्या साठी वय ६ वर्ष ते  ७ वर्ष ५ महिने ३० दिवस असावे.

 

 

Sharing

Visitor Counter