डाॅ.प्रशांत भालेराव यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार

डाॅ.प्रशांत भालेराव यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार
बीड/प्रतिनिधी
मुंबईच्या टाईम्स अप्लॉड या संस्थेच्या वतीने आर्थिक , सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या अंतर राष्ट्रीय स्थरावरील ' ट्रेंडसेटर २०२२ ' या पुरस्काराने श्री रेणुका माता मल्टिस्टेट अर्बन क्रेडीट को ऑप . सस्थेचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ . प्रशांत चंद्रकांत भालेराव यांना सन्मानित करण्यात आले . गुरुवारी ( दि २४ ) मुंबईत राज भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात महामहिम राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांचे हस्ते अर्थतज्ञ डॉ . प्रशांत भालेराव यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले . यावेळी आर्थिक , सामाजिक व वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील नाविन्य पूर्ण व उल्लेखनीय कार्य करणा - या राज्यातील अन्य ३२ मान्यवरांना देखील सन्मानीत करण्यात आले . देशातील नऊ राज्यात १ ९ ० शाखा व दहा लाख खातेदार असलेल्या श्री रेणुका माता मल्टिस्टेट अर्बन क्रेडीट को ऑप . संस्थेची स्थापना करून या संस्थेमार्फत शेअर मार्केट , कम्युडीटी मार्केट , विमा , बँकिंग आदी क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी तसेच रियल इस्टेट व आंतरराष्ट्रीय गुंतवणुकी संदर्भात , उद्योगधंदे उभारणीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाच्या आणि कंपनीचे शेअर बाजारात उतरविण्या संदर्भात अर्थ तज्ञ डॉ . भालेराव सातत्याने मार्गदर्शन करत असतात . या कार्याची आणि आर्थिक क्षेत्रात ते देत असलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .








