व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबवणार. अँड. संगीता चव्हाण

व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबवणार-अँड.संगीता चव्हाण
शेरकर दाम्पत्यांच्या कार्याला बळ देणार.
बीड/प्रतिनिधी
महिला अन्याय, अत्याचार,गुन्हा, इ आदी प्रकरणाच्या मुळाशी गेले तर कुठेतरी या सर्व प्रकरणात व्यसनाचा मुद्दा समोर येतो.आज शहरी आणी ग्रामीण भागात व्यसनाची मुळ पार घट्ट रुजलेली आहेत. व्यसनाच्या आजाराला बळी पडलेल्या व्यक्तीं च्या पिडीत महिला याच्या मरण यातना भोगत आहेत.यात नवजीवन व्यसनमुक्ती उपचार व मानसिक सल्ला केंद्र बीड हे शासनाच्या मदतीशिवाय अत्यंत चागंल्या पध्दतीने ग्रामीण व शहरी भागात उपचारासाठी कार्य करीत आहे. प्रा.अंजलीताई पाटील व डॉ. राजकुमार गवळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे शेरकर दाम्पत्य व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा या उद्देशाने अहोरात्र परीश्रम घेत आहेत. राजकारण बाजुला ठेवून आपण केवळ व्यसनमुक्त बीड जिल्हा ही संकल्पना राबविण्यासाठी आगामी काळात ,व्यसनमुक्ती परीषद महाराष्ट्र राज्य व प्रशासन आणी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र यांना सोबत घेऊन ग्रामीण व शहरी जनजागृती अभियान राबवण्यासाठी प्रयत्नशील राहु असे मत अँड. संगीताताई चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शासकीय विश्रामगृहात पार पडलेला बैठकीत व्यक्त केले.








